शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

घरांसाठी लवकरच सर्वेक्षण

By admin | Updated: April 26, 2017 23:50 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत पंतप्रधान आवास योजना राबवण्यासाठी सर्वेक्षणाकरिता मागवलेल्या निविदाला अखेर प्रतिसाद मिळाला आहे.

मुरलीधर भवार / कल्याणकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत पंतप्रधान आवास योजना राबवण्यासाठी सर्वेक्षणाकरिता मागवलेल्या निविदाला अखेर प्रतिसाद मिळाला आहे. दोन कंपन्यांनी निविदा भरली असून कामास आठवडाभरात सुरुवात होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना घरे मिळावीत, यासाठी २०१५ मध्ये पंतप्रधान आवास योजनेची घोषणा केली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने २०२२ पर्यंतचे उद्दिष्टपूर्तीचे लक्ष्य ठेवले आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला केडीएमसी हद्दीत मुळात उशिरा सुरुवात झाली. योजना राबवण्यासाठी सर्वेक्षणाकरिता महापालिकेने वर्षभरात चार वेळा निविदा मागवल्या. त्यानंतर, आता ग्लोबल आणि माहीमपुरा या दोन कंपन्यांनी सर्वेक्षणासाठी निविदा भरली आहे. या कंपन्या नामांकित असून चांगला अनुभवही आहे. महापालिकेच्या आठही प्रभाग क्षेत्रांत या दोन्ही कंपन्या सर्वेक्षण करतील. महापालिकेच्या येत्या स्थायी समितीच्या सभेत या कंपन्यांच्या निविदा मंजुरीसाठी ठेवल्या जातील. मंजुरीनंतर आठवडाभरात प्रत्यक्ष बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षणाला सुरुवात होईल. एका घराच्या सर्वेक्षणासाठी कंपनीला ६ हजार २०० रुपये दिले जातील. झोपडीधारकांचे सर्वेक्षण करताना ते तेथे किती वर्षांपासून राहतात, त्यांच्याकडील वास्तव्याची कागदपत्रे, महापालिकेस कर भरत असल्यास त्याची पावती, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती, त्यांचे लग्न झाले आहे का, भाडेकराराने राहत असल्यास त्याचे करारपत्र, मालकी हक्क असल्यास त्याचा पुरावा, मुलेमुली आईवडिलांवर अवलंबून आहे का, आदी माहिती सर्वेक्षणात नोंदवली जाईल. ही माहिती ‘जिओलॉजिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम’ व ‘मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम’ या दोन संकेतस्थळांवर अपलोड होईल. तसेच सर्वेक्षणाचा तपशील आधारकार्डशी जोडला जाणार असल्याने बोगस लाभार्थ्यांना आळा बसेल, अशी माहिती महापालिकेच्या गृह प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंते सुनील जोशी यांनी दिली.सर्वेक्षणासाठी ९० दिवसांची मुदत कंपन्यांना दिली आहे. मात्र, हे सर्वेक्षण ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे लक्ष्य जोशी यांनी ठेवले आहे. प्रत्येक प्रभाग क्षेत्र कार्यालयात एक सहायक अधिकारी योजनेचा अर्ज भरण्यासाठी उपलब्ध असेल. अर्ज मोफत मिळणार आहे. त्यामुळे योजनेच्या कामात कोणाचीही फसवणूक होऊ नये, याची खबरदारी घेतली जाणार आहे, असे जोशी म्हणाले. २००२ पूर्वी महापालिका हद्दीत जवळपास १८ हजार झोपड्या होत्या. २००२ मध्ये तत्कालीन आयुक्त श्रीकांत सिंह यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार महापालिका हद्दीत ७६ हजार झोपड्या आहेत. हे सर्वेक्षण २००२ मधील असल्याने त्यात आता दुपटीने वाढ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिका हद्दीत ७३ अघोषित झोपडपट्ट्या आहेत. त्यांना झोपडपट्ट्या जाहीर करण्याबाबतची नियमावली सरकारने शिथिल केली आहे. मात्र, महापालिकेच्या झोपडपट्टी सुधारणा विभागाने त्यावर अद्याप कार्यवाही केलेली नाही. झोपडपट्ट्या घोषित करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आयुक्तांना आहेत. ‘स्लम इम्प्रूव्हमेंट अ‍ॅक्ट’मध्ये शिथिलता आणली असताना त्याचा फायदा महापालिका प्रशासन घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आधीच्या सर्वेक्षणाचा या योजनेसाठी आधार घेता येऊ शकतो.