शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिका तपासणीच्या मोहिमेला राज्यात स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 01:06 IST

गॅस असणाऱ्यांचे रेशन होणार होते बंद : ‘श्रमजीवी’चा आंदोलनाचा इशारा

वाडा : महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने  दि. २८ जानेवारी २०२१ रोजी परिपत्रक काढून राज्यातील अपात्र शिधापत्रिका तपासणीची मोहीम राबविण्यास सुरुवात केली होती.  त्यासाठी अपात्र शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म तयार करून शिधावाटप दुकानदारांकडे देऊन सर्व लाभार्थीकडून हे फॉर्म भरून घेतले जात होते. या फॉर्ममध्ये सर्वात शेवटी जोडलेल्या  हमीपत्रात ज्यांच्याकडे गॅस जोडणी आहे, अशा लाभार्थ्यांचे रेशनकार्ड रद्द होणार असल्याचे लिहिले आहे. यामुळे आदिवासी तसेच गरिबांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस मिळाले आहेत, त्यांचे रेशनिंग बंद होऊन आदिवासी कातकरी व गरिबांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे सांगत श्रमजीवी संघटनेने याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. पण आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने या मोहिमेला राज्यात स्थगिती दिली आहे.शिधापत्रिका शोध मोहिमेत जो तपासणी फॉर्म शिधापत्रिका धारकाकडून भरून घेतला जात आहे, त्यात शेवटी हमीपत्राच्या मजकुरात अर्जदार शपथेवर सांगतो की, ‘माझ्या नावे तसेच माझ्या कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यांच्या नावे गॅस जोडणी केलेली नाही. माझ्या नावे किंवा कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणी असल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, याची मला जाणीव आहे’, अशी धारकांकडून हमी घेतली जात होती. हेच हमीपत्र आदिवासी, सामान्य नागरिकांच्या दृष्टीने अडचणीचे ठरणारे असून या अटीमुळे शिधापत्रिका रद्द होणार आहेत. दरम्यान, अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहिमेस आमचा विरोध नाही. परंतु शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ज्या आदिवासी गरिबांना गॅस दिलेले आहेत. जंगल वाचावे व चुलीच्या धुरामुळे महिलांचे आजारांपासून संरक्षण व्हावे या उद्देशाने स्वयंपाकासाठी गॅसचे वाटप केले. मग शासन असे  हमीपत्र भरून घेऊन रेशनिंग व्यवस्था बंद पाडण्याचा व गरिबांना उपाशी मारण्याचा डाव शासनाने आखला आहे का? असा सवाल करत या मोहिमेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत व या परिपत्रकाविरोधात १२ एप्रिल रोजी ठाणे पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात तीव्र आंदोलन करू, असा इशारा श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष  रामभाऊ वारणा यांनी दिला होता. तपासणी मोहीम रद्द करण्याची मागणीश्रमजीवी संघटनेच्या या आंदोलनाची चाहूल लागताच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने गुरुवारी १ एप्रिल रोजी पुन्हा एक परिपत्रक काढून अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहिमेला स्थगिती दिली आहे. मात्र ही अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम केवळ स्थगित करून चालणार नाही, रद्दच करा, अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी केली आहे.