शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

रक्ताचा थेंबही न सांडवत विरोधक नेस्तनाबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:26 IST

मीरा-भार्इंदरच्या राजकारणातील गुन्हेगारांची चलती आजही कायम आहे. फरक एवढाच झाला आहे की, पूर्वी दहशत माजवण्यासाठी वा विरोधकाला संपवण्यासाठी जसे हल्ले व्हायचे तसे थेट हल्ले आता हाती शस्त्रं घेऊन क्वचितच होतात.

मीरा-भार्इंदरच्या राजकारणातील गुन्हेगारांची चलती आजही कायम आहे. फरक एवढाच झाला आहे की, पूर्वी दहशत माजवण्यासाठी वा विरोधकाला संपवण्यासाठी जसे हल्ले व्हायचे तसे थेट हल्ले आता हाती शस्त्रं घेऊन क्वचितच होतात. आता पदाचा आणि सरकारी यंत्रणांचा पुरेपूर गैरवापर करुन विरोधकांना नामोहरम केले जात आहे. विरोधकांच्या घरावर दोनशे ते अडीचशे लोकांचा जमाव नेऊन दहशत माजवणे, तोडफोड करणे आदी प्रकार हे एकेकाळी केले जात होते. तशा घटना हल्ली वरचेवर घडत नाहीत. पण याचा अर्थ खून वा प्राणघातक हल्ले पूर्णपणे थांबले आहेत असे अजिबात नाही.

मीरा-भार्इंदरमध्ये जमीन, बांधकाम साहित्यपुरवठा, अनधिकृत बांधकामे, ठेकेदारी, केबल व्यवसाय आदी व्यवसायातून बख्खळ पैसा मिळत असल्याने साहजिकच राजकारण्यांना त्यातच जास्त स्वारस्य आहे. शहरातील प्रमुख बडे नेते हे याच सर्व धंद्यांमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे वैमनस्याचे मूळ कारण हे व्यवसाय हेच आहे.

मीरा-भार्इंदर म्हणजे विविध गावं एकत्र करुन तयार झालेले शहर आहे. त्यातही भार्इंदर व काशिमीरा ही एकेकाळी गुन्हेगारी आणि गुंडगिरीची प्रमुख केंदे्र. शिवसेना शाखाप्रमुख चंदू धर्माजी पाटील यांची १९९१ साली भररस्त्यात झालेली हत्या ही राजकारणातील पहिली हत्या म्हणावी लागेल. धर्माजी पाटील कुटुंबीय कट्टर शिवसैनिक. ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या ते अगदी मर्जीतले. चंदू पाटील यांचा शाखाप्रमुख म्हणून भार्इंदर पूर्व भागात दरारा होता. २ जून १९९१ रोजी सायंकाळी मित्राने बोलावले म्हणून चंदू बुलेटला टाच मारुन भार्इंदर रेल्वेस्थानकासमोरील रुपेश बारबाहेर पोहोचले. तेथे आधीच तयारीत असलेल्या ७ ते ८ हल्लेखोरांनी तलवारी, चॉपरने चंदूवर प्राणघातक हल्ला चढवला. रेल्वेस्थानकासमोर भरवर्दळीच्या रस्त्यात हे जीवघेणे थैमान सुरु असताना कोणी मध्ये पडले नाही. नि:शस्त्र चंदूने जोरदार प्रतिकार केला. पण तो फिका पडला. या हत्येत पोलिसांची भूमिका संशयास्पद होती. म्हणूनच पोलिसांनी अटक दाखवलेले सर्व आरोपी न्यायालयातून निर्दोष सुटले असून आजही त्यांना शिक्षा झालेली नाही.

जमीन आणि बांधकाम साहित्यपुरवठ्यात सक्रिय असलेली विरारची ‘कंपनी’ मीरा-भार्इंदरमध्येही आपले बस्तान बसवत होती. त्यातूनच ३ एप्रिल १९९१ रोजी हितेंद्र ठाकूर, राजीव पाटील हे गाडीने येत असताना सध्याच्या काशिगाव येथील आसीफ पटेल यांच्या बंगल्यासमोर दबा धरुन बसलेल्या पटेल टोळीने गाडी अडवून जोरदार हल्ला चढवला होता. काशिमीरा पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असल्याने दैव बलवत्तर म्हणून ते वाचले.

भार्इंदर पश्चिम भागात गिल्बर्ट मेंडोन्सा आणि मॉरस रॉड्रिक्स यांच्यात विस्तव जात नसे. त्यावरुन आपापसात नेहमीच राडे होत असत. काशिमीरा भागात पटेल टोळी विरुद्ध शिवसेनेचे शहरप्रमुख असणारे वासू नांबियार यांच्यात संघर्ष चालत होता. पटेल टोळी ‘टाडा’ आणि नंतर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई झाल्याने संपुष्टात आली. अस्मत पटेल, जुबेर पटेल आदींच्या हत्या झाल्या. कुख्यात तात्या पटेलने शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक होण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरले. आसिफ पटेल मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक झाले.मीरा-भार्इंदरच्या राजकारणात आपला ठसा उमटवणारे जनता दलाचे मिलन म्हात्रे यांच्यावर दोनवेळा प्राणघातक हल्ला झाला. दैव बलवत्तर म्हणून गंभीर जखमी होऊनदेखील ते वाचले. राजकारणात नव्याने आलेल्या या तरुणाने जनता दलाची कास धरली. विरारचे त्याकाळचे समाजवादी विचारांचे आमदार पंढरीअप्पा चौधरी हे म्हात्रेंचे पाठीराखे. भार्इंदर रेल्वेस्थानकासमोरील मिठागराच्या जागेत उभी राहिलेल्या इंदिरा मार्केटमधील एका दुकानात म्हात्रे सुतारकाम करीत. तेच त्यांचे नंतर राजकीय कार्यालय झाले. राजकारण्यांशी संबंधित असलेल्या हेमंत शाह यांच्या कुटुंबीयांशी जागेवरुन वाद सुरु होता. २४ नोव्हेंबर १९९१ रोजी नगर परिषदेची निवडणूक होती आणि ते जनता दलाचे उमेदवार होते. १ नोव्हेंबर १९९१ रोजी कार्यालयात असताना धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यावेळी सुदाम वानखेडे, महाडिक, मिलिंद आडे हे तिघे आरोपी होतेच. पण त्या हल्ल्यामागे गिल्बर्ट मेंडोन्सा आणि हेमंत शाह यांचा हात असल्याचा आरोप म्हात्रेंनी केला होता. त्यावेळचे भार्इंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबा चंद्रमोहन निंबाळकर यांनी दोघांची नावं वगळली, असा आरोप करीत निंबाळकर यांच्याविरोधात जनता दलाने रान उठवल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले. उल्हास जोशी यांनी पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर निंबाळकरला ‘टाडा’ खाली गजाआड केले गेले.

यापूर्वी १९९१ सालच्या प्राणघातक हल्ल्यातून बचावलेल्या मिलन म्हात्रेंवर २० जानेवारी १९९९ साली त्यांच्या कार्यालयामागे दुसरा प्राणघातक हल्ला झाला. जखमी म्हात्रे दैव बलवत्तर म्हणून पुन्हा वाचले. दुसऱ्या हल्ल्यात मेंडोन्सा, मुकेश मेहता आदी आरोपी होते. फरार झालेल्या मेंडोन्सा यांना नंतर तब्बल सव्वातीन महिने जेलमध्ये राहावे लागले. पण पुढे पुराव्यांअभावी आरोपींची सुटका झाली.विरारमधील ‘कंपनी’चा माणूस अशी ओळख असलेले दिलीप माणिक बाबर शहराच्या राजकारणात वेगाने प्रकाशझोतात आले. नगर परिषद असताना ते उपनगराध्यक्ष झाले. मीरा-भार्इंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांना मिळाले होते. भार्इंदर पूर्वेच्या ओस्तवाल अ‍ॅनेक्समध्ये राहणाºया बाबर यांची १४ जुलै २००० रोजी निर्घृण हत्या झाली. घरी असलेल्या बाबरना सकाळी खाली कोणी तरी भेटायला आले म्हणून निरोप गेला. खाली आलेल्या बाबरांवर दबा धरुन बसलेल्या मारेकऱ्यांनी धारदार शस्त्रांनी असंख्य वार करुन त्यांची जागीच हत्या केली.

मीरा-भार्इंदरच्या राजकारणात आपल्या बुद्धी आणि धाडसाने दरारा निर्माण करणारे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांची २०१० साली अतिशय निर्घृण हत्या झाली. नगरपालिका असताना नगराध्यक्षपद मिळवणारे आणि स्वत: वरील अविश्वास प्रस्ताव परतवून लावणारे प्रफुल्ल पाटील हे महापालिका झाल्यावर काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले. काँग्रेसच्या मुझफ्फर हुसेन यांच्याशी त्यांचे जमले नाही. २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नरेंद्र मेहता यांना पराभूत करुन गिल्बर्ट मेंडोन्सा आमदार झाले. मेहतांच्या पराभवात प्रफुल्ल यांची भूमिका महत्त्वाची होती, असे बोलले जात होते. प्रफुल्ल यांचे जमिनीवरुन काहींशी वाद होते. ८ मे २०१० रोजी सकाळी प्रफुल्ल पाटील हे अभिनव शैक्षणिक संकुलाच्या आवारात असताना दोघा मारेकºयांनी आवारात शिरुन त्यांची अतिशय निर्घृण हत्या केली. एकाने त्यांच्यावर जवळून गोळी झाडली, तर दुसºयाने धारदार शस्त्राने सपासप वार केले. संकुलात अनेक सुरक्षारक्षक, कर्मचारी असूनही हल्लेखोर पळाले. या हत्याकांडाने खळबळ उडाली. बीबीसी न्यूजने या हत्येची दखल घेतली होती.जमिनीच्या वादातून ही हत्या झाली व काँग्रेसचे तत्कालीन महापौर तुळशीदास म्हात्रे यांचा पुतण्या विशाल म्हात्रे आणि भाजप नगरसेवक मुन्ना सिंग याचा भाऊ राजेश सिंग यांना हत्येचे सूत्रधार म्हणून अटक करण्यात आली. प्रफुल्ल पाटील यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा निकाल अजून आलेला नाही.

मीरा-भार्इंदरच्या राजकीय पटलावर सध्या भाजप आ. नरेंद्र मेहतांचा दबदबा आहे. २००२ साली नगरसेवक झाल्यावर लाच घेताना पकडलेल्या मेहतांवर खंडणीपासून विविध गुन्हे दाखल आहेत. त्याबाबत न्यायालयीन दावे सुरु आहेत. लाचलुचपत विभागाकडून बेनामी संपत्तीची खुली चौकशी सुरु आहे. शहरातील जमिनी ताब्यात असलेली मोठी कंपनी ७११ ही मेहतांच्या मालकीची आहे. केबल, हॉटेल, बांधकाम आदी अनेक व्यवसायावर मेहतांचा वरचष्मा आहे.मीरा-भाईंदर महापालिकेत सध्या ‘पिटा’पासून अन्य गंभीर गुन्हे असलेले नगरसेवक आहेत. राजकीय आणि व्यावसायिक विरोधकांना यंत्रणांमार्फत जेरीस आणले जात असून राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे स्वरुप झपाट्याने बदलले आहे.

एकेकाळी खंडणी वसुलीतून मीरा-भाईंदरमधील काही राजकीय नेते पैसे मिळवत होते. आता तो जमिनी, बेकायदा बांधकामे, टेंडर, टीडीआर, बांधकाम परवानग्या, लॉज -आॅर्केस्ट्रा- बार, केबल, फेरीवाले या मार्गाने मोठ्या प्रमाणात मिळू लागल्याने आहे. या व्यवसायावर वरचष्मा असलेल्यांच्या सरकारी यंत्रणा बटीक बनल्या आहेत. पूर्वी राजकीय विरोधकास संपवण्यासाठी शस्त्रांनी हल्ले केले जायचे. आता रक्ताचा थेंबही न सांडवता विरोधक संपवले जात आहेत.पूर्वी पैसा वा अस्तित्वासाठी रस्त्यावर होणारा खूनखराबा करण्याची आता गरज राहिलेली नाही. कारण, गुन्हेगारी प्रवृत्तीच राजकारणात आल्याने त्यांच्यासमोर पोलिसांपासून सर्वच प्रशासकीय यंत्रणेने हार पत्करलेली आहे. पोलीस दाखल गुन्ह्याचा तपास करीत नाहीत. त्यामुळे गुन्हेगार राजकारणी सहज सुटतात. आता गुन्हेगारीचे फक्त स्वरूप बदलले आहे. मात्र, राजकीय दबावामुळे शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.- ओमकार म्हात्रे, तरुण, भार्इंदरशहरातील विविध नामचीन गुन्हेगारांना सन्मानाचे प्रमाणपत्र देणारी आश्रयस्थाने राजकीय पक्ष झालेले आहेत. सत्ता आणि पैसा यासाठी पक्षांनी तत्त्व आणि ध्येयधोरणांना तिलांजली दिली आहे. सत्तेमुळे पालिका, पोलीस आदी शासकीय यंत्रणांचा