शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

केडीएमसी तयार करणार कचऱ्यापासून बायोगॅस

By admin | Updated: January 25, 2016 01:22 IST

कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या ६० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाकरिता मागवलेल्या निविदांना अत्यल्प प्रतिसाद मिळत

मुरलीधर भवार,  कल्याणकल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या ६० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाकरिता मागवलेल्या निविदांना अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने कचऱ्यापासून बायोगॅस, खत निर्मिती आणि प्लॅस्टिक कचऱ्याचा पुनर्वापर हे तीन पर्याय महापालिका निवडणार आहेत. घनकचरा व्यवस्थापनाकरिता महापालिकेने काय उपाययोजना केली याचा जाब २७ जानेवारीस उच्च न्यायालयात द्यायचा असल्याने प्रशासनाची अक्षरश: धडपड सुरु झाली आहे.कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत ५७० मे.ट. कचरा दररोज गोळा होता. महापालिकेत २७ गावे समाविष्ट झाल्याने या गावातून निर्माण होणारा ७० मे.ट. कचऱ्याची वाढ झाली आहे. महापालिकेने घनकचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणारा प्रकल्प न उभारल्याने उच्च न्यायालयाने शहरातील नव्या इमारतींच्या बांधकाम परवानगीस एप्रिल २०१५ मध्ये स्थगिती दिली. महापालिका आधारवाडी येथील क्षमता संपलेल्या डंपिंग ग्राऊंडवर प्रक्रिया न करता कचरा टाकते त्याला न्यायालयाने बंदी केली. आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी महापालिकेने आत्तापर्यंत आठवेळा निविदा मागविल्या. यावेळी केवळ एक निविदा प्राप्त झाली असून लवकरच अंतिम फैसला होणार आहे. महापालिकेस बारावे व मांडा या दोन ठिकाणी भरावभूमी तयार करायची आहे. मांडा येथील काही जागाच महापालिकेच्या ताब्यात आहेत. उर्वरित जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. बारावेकरीता मागवलेली निविदा २५ जानेवारी रोजी उघडण्यात येणार आहे. उंबर्डे व तिसगांव येथे कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्याचे दहा टन क्षमतेचे प्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. या निविदेस तीन कंत्राट कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. प्रकल्प उभारण्यासाठी किमान दोन कोटी ५० लाख ते तीन कोटी रुपये खर्च येतो. प्रकल्प सुरु केल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी पुन्हा तीन कोटी रुपये खर्च येतो. शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यापैकी ५६ टक्के कचरा हा जैव विविध व विघनटशील स्वरुपाच आहे. ५७० शहरातील व २७ गावातील ७० मेट्रीक टन कचरा मिळून एकूण कचरा ६४० मेट्रीक टन गोळा होता. त्यापैकी विघटनशील कचऱ्याचे प्रमाण ५६ टक्के धरले तर ६४० मेट्रीक टन कचऱ्यापैकी ३५० मेट्रीक टन ओला कचरा हा विघटनशील स्वरुपाचा असेल. दहा टन क्षमतेचे किमान ३५ बायोगॅस प्रकल्प उभारावे लागतील. शहरात किमान दहा ते १५ मोकळ््या जागेवर कचऱ्यापासून खत निर्मिती करता येऊ शकते. त्यासाठी फार खर्च नाही. एका ठिकाणी किमान एक लाख खर्च येऊ शकतो. पंधरा जागी राबविण्याचे ठरविल्यास त्याला विघटनशील सुका कचरा आवश्यक असेल. याशिवाय ई वेस्ट गोळा करणारे एक स्टेशन एका कंत्राटदारामार्फत सुरु करण्यासाठी महापालिकेतर्फे निविदा मागविली जाणार आहे.