उल्हासनगर महानगरपालिकेत भाजपा-शिंदेसेनेत सत्तेसाठी 'फिल्डिंग'; वंचितचे नगरसेवक 'नॉट रिचेबल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 18:26 IST2026-01-17T18:25:27+5:302026-01-17T18:26:09+5:30

उल्हासनगर महापालिकेत एकूण ७८ जागा असून बहुमतासाठी ४० हा आकडा गाठणे आवश्यक आहे. भाजपकडे-३७ तर शिंदेसेना ओमी टीमचे ३६ जागा निवडून आल्या आहेत.

In the Ulhasnagar Municipal Corporation, there is a fierce competition between the BJP and Shiv Sena for the mayor post; who will come to power? | उल्हासनगर महानगरपालिकेत भाजपा-शिंदेसेनेत सत्तेसाठी 'फिल्डिंग'; वंचितचे नगरसेवक 'नॉट रिचेबल'

उल्हासनगर महानगरपालिकेत भाजपा-शिंदेसेनेत सत्तेसाठी 'फिल्डिंग'; वंचितचे नगरसेवक 'नॉट रिचेबल'

सदानंद नाईक

उल्हासनगर : महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता खऱ्या अर्थाने सत्तेचा पेच निर्माण झाला. ७८ जागांच्या सभागृहात स्पष्ट बहुमत कोणाकडेच नसल्याने, सत्तेची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी भाजप आणि शिंदे गटात जोरदार चढाओढ सुरू झाली. या सत्तानाट्यात आता वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांना किंगमेकरची भूमिका मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 

उल्हासनगर महापालिकेत एकूण ७८ जागा असून बहुमतासाठी ४० हा आकडा गाठणे आवश्यक आहे. भाजपकडे-३७ तर शिंदेसेना ओमी टीमचे ३६ जागा निवडून आल्या आहेत. साई पक्षाच्या दीप्ती दुधानी व अपक्ष सविता तोरणे-रगडे हे शिंदेसेना महागठबंधन मधील नगरसेवक असल्याने, शिंदेसेना महागठबंधनचा आकडा ३६ वरून ३८ वर जातो. मात्र सत्तेसाठी त्यांना २ नगरसेवकाची गरज आहे. वंचित बहुजन आघाडीकडे २ नगरसेवक असून त्यांनी वंचित उमेदवारांना आमिष दाखविल्याचे बोलले जात आहे. वंचितचे विकास खरात व सुरेखा सोनावणे शिंदेसेनेकडे आल्यास त्यांची एकूण सदस्य संख्या ४० वर जाणार आहे. 

वंचितचे नगरसेवक 'आउट ऑफ
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते सोनू पवार यांनी खळबळजनक दावा केला आहे की, भाजप आणि शिंदे सेनेकडून त्यांच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सत्तेसाठी विविध प्रलोभने आणि आमिषं दाखवली जात असल्याच्या भीतीपोटी पक्षाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही नवनिर्वाचित नगरसेवक विकास खरात आणि सुरेखा सोनावणे यांना अज्ञातस्थळी पाठवले आहे. भविष्यात कोणताही दगाफटका होऊ नये आणि पक्षाची निष्ठा जपली जावी, यासाठी पक्षप्रमुखांच्या आदेशाने नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, अशी कबुली सोनू पवार यांनी दिली.

भाजपचा 'गळ' आणि शिंदे सेनेचा दावा 
भाजपचे शहराध्यक्ष राजेश वधारिया आणि आमदार कुमार आयलानी यांनी सत्तेचा दावा केला असला, साई आणि अपक्ष नगरसेवकांना आपल्याकडे वळवावे लागणार आहे. दीप्ती दुधानी आणि सविता तोरणे-रगडे यांना भाजपकडून 'गळ' घातला जात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. 

निर्णायक भूमिका कोणाची?
उल्हासनगरच्या सत्तेची चावी आता 'वंचित'च्या दोन नगरसेवकांच्या हाती असल्याचे चित्र आहे. जर या दोन नगरसेवकांनी शिंदे गटाला साथ दिली, तर त्यांचा सत्तेचा मार्ग सुकर होईल. मात्र, भाजप जर अपक्षांना फोडण्यात यशस्वी ठरली, तर समीकरणे बदलू शकतात.

Web Title : उल्हासनगर महानगरपालिका: भाजपा-शिंदे सेना सत्ता के लिए प्रयासरत; वंचित पार्षद 'नॉट रिचेबल'

Web Summary : उल्हासनगर में भाजपा और शिंदे सेना सत्ता के लिए प्रतिस्पर्धा कर रहे हैं। स्पष्ट बहुमत न होने से, वंचित बहुजन आघाडी के दो पार्षद किंगमेकर बने, जिन्हें खरीद-फरोख्त के प्रयासों के बीच सुरक्षित स्थान पर ले जाया गया।

Web Title : Ulhasnagar Municipal Corporation: BJP-Shinde Sena vie for power; VBA corporators unreachable.

Web Summary : BJP and Shinde Sena compete for power in Ulhasnagar. With no clear majority, the VBA's two corporators become kingmakers, moved to a safe location amid poaching attempts.