शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षात गेले १७५ बळी

By admin | Updated: August 5, 2015 00:35 IST

ठाणे महापालिकेने पावसाळा सुरु होण्यापूर्वीच शहरातील ५८ अतिधोकादायक इमारतींपैकी ३६ इमारतींवर पाडकाम कारवाई सुरुवात केली असली तरी मागील

अजित मांडके, ठाणे ठाणे महापालिकेने पावसाळा सुरु होण्यापूर्वीच शहरातील ५८ अतिधोकादायक इमारतींपैकी ३६ इमारतींवर पाडकाम कारवाई सुरुवात केली असली तरी मागील २० वर्षात शहरात विविध ठिकाणी १४ इमारत दुर्घटना घडल्या असून त्यामध्ये आतापर्यंत १७५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर १३७ जण जखमी झाले असून यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. परंतु या इमारती का उभ्या राहतात, त्याला जबाबदार कोण हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. विशेष म्हणजे शहरात दरवर्षी अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची संख्या ही वाढतच असून भय इथले संपत नाही, नव्हे तर ‘भय इथले कधीच संपणार नाही’ असे म्हणण्याची वेळ ठाणेकरांवर ओढवली आहे. अजून किती बळी घेणार असा संतप्त सवाल त्यांच्याकडून होऊ लागला आहे. ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत अथवा धोकादायक इमारतींचा प्रश्न हा आजचा नाही, मागील २० वर्षे या शहराला अशा इमारतींचा प्रश्न भेडसावत आहे. १४ डिसेंबर १९९५ रोजी ठाण्यात पहिली इमारत दुर्घटना घडली. ती सुद्धा मुंब्य्रातील रशिद कंपाऊंड परिसरात. या दुर्घटनेत २४ जणांचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले होते. त्यानंतर वागळे इस्टेट भागात ०७ नोव्हेंबर १९९८ मध्ये साईराज इमारत दुर्घटना घडली. यामध्ये १६ जणांचा बळी जाऊन १४ जण जखमी झाले होते. दरम्यान अशा इमारत दुर्घटना घडत असतांनाच ४ एप्रिल २०१३ रोजी, मुंब्य्रात लकी कंपाऊंडमध्ये केवळ सात महिन्यात उभारण्यात आलेली सात मजली इमारत कोसळून तब्बल ७४ जणांचा बळी गेला आणि ५६ जण जखमी झाले होते. त्यानंतर पालिका प्रशासन, वनविभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्य म्हणजे राजकीय मंडळी खडबडून जागे झाले आणि त्यांनी ठाण्यासाठी क्लस्टर लागू करा अशी मागणी रेटून धरली. यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलनेही झाली. मागील वर्षी ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन आघाडी सरकारने ठाण्यासाठी क्लस्टर लागू केले. परंतु अंमलबजावणी मात्र झाली नाही.ही चर्चा आता केवळ पावसाळ्यापुरती मर्यादीत राहिली असून, पावसाळा संपला की पुढील पावसाळ्यापर्यंत यावर सर्व पक्षीय नेत्यांचे मौन असते. परंतु, यामुळे ठाण्यात इमारत कोसळण्याच्या दुर्घटना वाढतच असून याला जबाबदार कोण आणि किती बळी घेणार असा सवाल मात्र या निमित्ताने ठाणेकर उपस्थित करु लागले आहेत.