शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
7
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
8
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
9
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
10
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
11
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
12
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
13
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
14
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
15
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
16
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
17
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
18
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
19
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
20
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान

अनधिकृत बांधकाम करा अन् फुकट राहा

By admin | Updated: June 27, 2016 02:39 IST

अनधिकृत बांधकामे आणि त्यांच्यावरील कारवाईचा पेच सुटता सुटत नाही.

- पंकज पाटीलअनधिकृत बांधकामे आणि त्यांच्यावरील कारवाईचा पेच सुटता सुटत नाही. अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. पालिका कारवाई करेल, या भीतीने भूमाफियांनी आपला मोर्चा खाजगी जागांवर आणि पालिका वगळता इतर शासकीय भूखंडांकडे वळवला आहे. भूमाफियांमध्ये राजकीय व्यक्तींचाही समावेश असून त्यांनी आपल्या परिसरात झोपडपट्टी उभारून स्वत:ची व्होट बँक निर्माण केली आहे. याबाबत, तक्रार केली तरी पालिका प्रशासन हा भूखंड पालिकेचा नसल्याचे कारण पुढे करून आपली जबाबदारी झटकत आहे. अंबरनाथमध्ये अनधिकृत बांधकामे रोखता यावीत, यासाठी गेल्या वर्षी अनधिकृत बांधकामांना घरपट्टी न लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. मात्र, या निर्णयाचा कोणताही लाभ होताना दिसत नाही. उलट, अनधिकृत बांधकाम करा आणि कोणतेही कर न भरता शहरात फुकट राहा, अशी परिस्थिती निर्माण झाली. अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय पालिकेने घेतला. प्रत्येक क्षेत्रासाठी अधिकारी नेमण्यात आले. तसेच त्यांच्यावर त्या अनधिकृत बांधकामांची जबाबदारी निश्चित करण्याचे ठरले. उलट, अधिकारी आणि भूमाफिया यांच्यातील हितसंबंध वाढले. पूर्वी शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदा चाळींचे बांधकाम करून विक्री केली जात होती. आता मोठ्या प्रमाणात झोपड्या उभारण्याचे काम सुरू केले आहे. एकाच वेळी २०० ते २५० झोपड्या उभारण्यात येतात. अंबरनाथ ‘विम्को’ कंपनीच्या शेजारी असलेला भूखंड एका खाजगी व्यक्तीचा असून त्याने तो बँकेकडे तारण ठेवला आहे. याची माहिती भूमाफियांना मिळताच त्यांनी या संपूर्ण भूखंडावर रातोरात २५० हून अधिक झोपड्या उभ्या केल्या. एवढेच नव्हे तर त्या आपल्या मर्जीतल्या लोकांना राहायला दिल्या. या झोपडपट्टीधारकांकडून दर महिन्याला ते भाडे घेत आहेत. सर्व रहिवाशांचे निवासाचे बनावट पुरावे तयार करून त्यांचे नाव मतदार यादीत टाकण्यात आले. प्रत्येकाला रेशनकार्ड मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या वस्तीचे आपण मालक असून आमच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही वागा, नाहीतर घर खाली करा, अशी धमकी दिली जात आहे. रातोरात झोपडपट्टी उभी करून या भूमाफियांनी स्वत:च्या उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला तसेच आपल्याला संरक्षण देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांकरिता हक्काची व्होट बँक तयार केली आहे. अंबरनाथ तहसीलदार कार्यालया मागील भूखंडावरही हेच चित्र आहे. तहसीलदार कार्यालय ते स्टेशन या संपूर्ण परिसरात पालिकेची आणि अंबरनाथ आयुध निर्माण कारखान्याची जागा आहे. संरक्षण विभागाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम झाल्यास त्याचा फटका सुरक्षेला बसण्याची भीती आहे. तहसीलदार कार्यालयाच्या मागच्या बाजूला ‘फुकट बस्ती’ नावाची एक मोठी वस्ती उभी राहिली आहे. मुंब्रा आणि गोवंडी या भागांतील सराईत गुन्हेगारांची येथे वस्ती आहे. अवघ्या वर्षभरात ही मोठी वस्ती उभारण्यात आली. वस्ती उभारल्यावर त्यांना वीज आणि पाण्याची सोय राजकीय भूमाफियांनी उपलब्ध करून दिली. या सगळ्याची वेळीच दखल पालिका प्रशासनाने घेतली नाही तर ज्या सुविधा अंबरनाथवासीयांना देणे अपेक्षित आहे, त्यावर हे डल्ला मारतील आणि कर भरणारा अंबरनाथकर वंचित राहील.।अतिक्रमण... अंबरनाथ शिव मंदिर परिसरातील प्रकाशनगर झोपडपट्टी ही पालिकेच्याच भूखंडावर उभी आहे. या परिसराला लागून असलेल्या बारकूपाडा परिसरात चाळींची मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. अंबरनाथ पालिकेचा सर्वात मोक्याचा भूखंड म्हणजे सर्कस मैदान. हा भूखंड स्टेशनला लागून असल्याने त्याची किंमत अद्याप पालिकेलाच नाही. येथील रहिवाशांना जांभूळ येथे जागा दिलेली असतानाही ते येथील जागेचा हक्क सोडत नाहीत. अंबरनाथ स्टेशनला लागूनच बस डेपोची आरक्षित जागा आहे. या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यात बहुसंख्य अतिक्रमण हे व्यापाऱ्यांनी केले आहे. हा भूखंड मोकळा करून त्याचा वापर बस डेपोसाठी करणे शक्य आहे. मात्र, पालिका प्रशासन हा आरक्षित भूखंड मोकळा करण्यासाठी कोणतेच पाऊल उचलत नाही.