शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

ठाणे शहरातील धोकादायक झाडांच्या बाबतीत नागरिकांकडून सूचना मागविणार, वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 18:43 IST

महत्त्वाच्या विविध विषयांवर आज महापालिकेत बैठक पार पडली. आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

ठळक मुद्देमहत्वाच्या विषयांवर वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णयसंजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाडांवर खिळा ठोकून बॅनरबाजी करण्यांविरूद्ध कडक कायदेशीर कारवाई

ठाणे : ठाणे शहरातील सार्वजनिक उद्यानांची दुरूस्ती करणे, तेथील शौचालयाची दुरूस्ती करणे, प्रत्येक ठिकाणी पाणी, वीज आणि निगा व देखभालीसाठी विशेष तरतूद आणि धोकादायक वृक्षांच्याबाबतीत नागरिकांडूनही सूचना मागविणे आदी महत्वाच्या विषयांवर वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आले. आज सकाळी महापालिका आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या परिषद दालनामध्ये ही बैठक संपन्न झाली.                    या बैठकीत शहरातील सर्व सार्वजनिक उद्यानांची डागडुजी करणे, अस्तित्वात असलेल्या सर्व शौचालयांचा सद्यस्थिती अहवाल ७ दिवसांत मागविण्यात येणार असल्याचे सांगून त्यांनतर १० दिवसात त्याबाबतचा कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणे तसेच या शौचालयांची साफसफाई महिला बचत गटामार्फत करण्याच्या सूचना प्राधिकरणाचे अध्यक्ष जयस्वाल यांनी दिल्या. दरम्यान सर्व उद्यानांच्या ठिकाणी वीज आणि पाणी याची व्यवस्था करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतची चर्चा या बैठकीत होवून शहरातील अस्तित्वातील कूपनलिकांचे पुनर्भरण करून त्या पाण्याचा वापर उद्यांनासाठी करण्याबाबत या बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीत उद्यान दत्तक घेणे, पार्क वॉच, गार्डन सिटी फंड या सारख्या विषयांवर चर्चा करण्यात येवून याबाबत तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश  जयस्वाल यांनी दिले. त्याचबरोबर धोकादायक अवस्थेतील वृक्षांबाबत नागरिकांकडूही सूचना मागवून त्यावर कारवाई करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच झाडांवर खिळा ठोकून बॅनरबाजी करण्यांविरूद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त