शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:40 IST

ठाणे : मालमत्ता कर आणि पाणीकरातून ठाणे महापालिका थोडीशी सावरल्यासारखी दिसत होती. परंतु, कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती पुन्हा ...

ठाणे : मालमत्ता कर आणि पाणीकरातून ठाणे महापालिका थोडीशी सावरल्यासारखी दिसत होती. परंतु, कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती पुन्हा खालावली आहे. त्यातल्या त्यात जीएसटीची रक्कम तिजोरीत जमा झाल्याने कर्मचाऱ्यांचा पगार निघेल अशी परिस्थिती समोर आली आहे. शहर विकास विभागासह इतर विभागांनी घोर निराशा केल्याने महापालिकेच्या तिजोरीवर त्याचा परिणाम झाला असून, केलेल्या कामांचे पैसे देण्यासाठीही निधी नाही. यामुळे ठेकेदारांची बिलेदेखील थांबविली आहेत.

मागील वर्षभरापासून संपूर्ण देशात कोरोनाचा कहर असून, त्याचा महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावरदेखील परिणाम झाला आहे. त्यामुळे आयुक्तांनी अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या प्रकल्पांना वाव न देता काही कागदावरील प्रकल्पांना तूर्तास कात्री लावली आहे. परंतु, असे असतांनाही आता फेब्रुवारी अखेरपासून शहरात पुन्हा कोरोनाचा कहर दिसू लागला आहे. त्यामुळे महापालिकेने यासाठी राखीव निधी ठेवण्याचे निश्चित करून इतर कामांचा निधी कापण्याचा विचार केला आहे. तसेच ठेकेदारांची बिलेदेखील याच कारणामुळे थांबविल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.

त्यातल्या त्यात महापालिकेला मालमत्ताकर आणि पाणी विभागाने तारल्याचे दिसून आले आहे. मालमत्ताकर विभागाला ६४५ कोटींचे लक्ष दिले होते. त्यानुसार आतापर्यंत ५७७ कोटींची वसुली झाली आहे. पाणी विभागाकडून १६० कोंटीच्या तुलनेत १३७ कोटींची वसुली झाली आहे. त्यानुसार इतर सर्व विभागांचे मिळून महापालिकेच्या तिजोरीत दोन हजार ३३५ कोटी जमा झाले आहेत. त्यातून महसुली खर्च एक हजार ४९६ कोटी आणि भांडवली खर्चावर ५१० कोटींचा खर्च केला आहे. तसेच इतर कामांसाठीदेखील निधी खर्च झाला असल्याने पालिकेच्या तिजोरीला हा भार पेलने कठीण झाले आहे.

तिसऱ्या यादीपर्यंतची बिले अदा

ठाणे महापालिकेच्या तिजोरीत जसजसा निधी जमा होऊ लागला, त्यानुसार मागील मार्च महिन्यात झालेल्या कामांचे आणि इतर कामांचे पैसे टप्प्याटप्प्याने करून १०० टक्के बिल अदा केले आहे. परंतु, चौथ्या यादीचे काम सुरू असून, त्यासाठी किती निधी द्यावा लागणार याचा अंदाज अद्यापही नाही, त्यामुळे यादी तयार करण्याचे काम जरी सुरू असले तरी तिजोरीत पैसे किती असणार त्यानुसार टप्प्याटप्प्याने बिले काढण्याचा पालिकेचा विचार आहे.

जीएसटीने सावरले कर्मचाऱ्यांचे पगार

ठाणे महापालिकेच्या तिजोरीत जीएसटीचे ८४० कोटींपैकी ८३९ कोटी जमा झाल्याने कर्मचाऱ्यांचा पगार निघण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावर महिनाकाठी ६५ कोटींच्या आसपास खर्च होत आहे.

स्टॅम्प ड्युटीच्या १०० कोटींवर आता लक्ष

महापालिकेच्या तिजोरीत येत्या आर्थिक वर्ष अखेर स्टॅम्प ड्युटीची १०० कोटींची रक्कम मिळणे अपेक्षित आहे. त्या रकमेतूनच ठेकेदारांची बिले देण्याचा पालिकेचा विचार आहे. परंतु, किती रकमेची बिले द्यायची याचा अद्यापही विचार झालेला नसल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

एकूण अपेक्षित उत्पन्न - मिळालेले उत्पन्न

२८०७ कोटी - २३३५ कोटी

मालमत्ता कर विभाग

६४५ कोटी - ५७७ कोटी

शहर विकास विभाग

२६० कोटी - १४५ कोटी

अग्निशमन

४८ कोटी - १७ कोटी

पाणीपुरवठा

१६० कोटी - १३७ कोटी