शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

CoronaVirus News: फेरीवाल्यांची गर्दी देते कोरोनास निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:59 IST

मीरा-भाईंदरमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर : तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष

मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये बेकायदेशीर फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली असून, त्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यात महापालिका, पोलिसांसह स्थानिक नगरसेवक अपयशी ठरले आहेत. फेरीवाल्यांचे बाजार, खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरील गर्दी कोरोना संसर्गवाढीला मोठे कारण मानले जात असतानादेखील अर्थपूर्ण लागेबांधे असल्याने ठोस कारवाई केली जात नाही.मीरा-भाईंदरमध्ये फेरीवाले आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्यांवर मोठे अर्थचक्र चालत असते. जेवढे फेरीवाले तेवढे बाजार वसुली करणाऱ्या ठेकेदारांचे उखळ पांढरे होते. शिवाय पालिका प्रशासनासह स्थानिक नगरसेवक-राजकारण्यांचे अर्थपूर्ण लागेबांधेही ते वाढवण्यास कारणीभूत ठरले आहेत.फेरीवाल्यांविरोधात आधी बोंब करायची मग वजन वाढवून चिडीचूप व्हायचे, असा नगरसेवकांचा किस्सासुद्धा चर्चेत आहे. फेरीवाल्यांच्या हातगाड्यासुद्धा भाड्याने देणारी टोळी आहे. साहजिकच प्रचंड आर्थिक फायद्याच्या या घटकाकडे चराऊ कुरण म्हणून पहिले जात असल्याने शहरात त्यांचे साम्राज्य पसरले आहे.रेल्वेस्थानक परिसरात १५० मीटर तर शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, रुग्णालय परिसरात १०० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. परंतु, तेथे सर्रास फेरीवाल्यांचा विळखा पडलेला आहे. ना फेरीवाला क्षेत्रात तर फलकांखालीच महापालिकेच्या नाकावर टिच्चून फेरीवाले बसत आहेत. वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा गंभीर झाला असताना फेरीवाल्यांनाच पाठीशी घातले जाते.कोरोनाचा संसर्ग एकीकडे पसरत असताना बहुतांश फेरीवाले हे मास्क न घालताच असतात. अनेक जण नाका-तोंडा खाली मास्क ठेवतात. त्यांच्याकडे सॅनिटायझर नसते. फेरीवाल्यांच्या ठिकाणी सतत लोकांची गर्दी होत असते. मास्क न घालणाऱ्या ग्राहकांनासुद्धा ते रोखत नाहीत. रस्ते-पदपथांवर बसणारे फेरीवाल्यांच्या भाजी व अन्य विक्रेत्यांकडे जशी गर्दी असते तशीच गर्दी खाद्यपदार्थ विक्रेत्या हातगाड्यांवर दिसते.  कोरोना नियमावलीचे सर्रास उल्लंघनशहरात बेकायदेशीर आठवडे बाजारसुद्धा जोरात चालतात. भाईंदर रेल्वेस्थानकाजवळ भल्या पहाटे भरणारा मासळी बाजार असो की डॉ. आंबेडकर ६० फुटी मार्ग, भाईंदर पूर्व खारीगाव, मीरारोड स्थानक येथे पहाटे भरणारा भाजीचा घाऊक बाजार, गर्दीने फुललेला असतो. मास्क न घालणे हे तर नित्याचेच झाले आहे. रहदारी व पादचाऱ्यांना नेहमीच वेठीस धरणाऱ्या बेकायदा फेरीवाल्यांनी आता कोरोना संसर्ग रोखण्याच्या नियम निर्देशांचेसुद्धा उघडउघड उल्लंघन चालवले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या