शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

CoronaVirus News: सावधान, आता लहान मुलेही आली कोरोनाच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:57 IST

९८३ बालकांना दुसऱ्या लाटेत कोरोनाची बाधा

- अजित मांडकेठाणे : राज्यात लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढत असताना आता ठाणे शहरातही त्यांना कोरोनाची बाधा होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लहान मुलांना घराबाहेर पडू देऊ नका. त्यांची काळजी घ्या. खेळण्यासही बाहेर सोडू नका, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत सुमारे ९८३ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. अवघ्या एक महिन्यात लहान मुलांची संख्या वाढताना दिसून आली आहे. त्यामुळे ज्येष्ठांबरोबर लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून आता दिवसाला दीड हजारच्या आसपास कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. महापालिका हद्दीत सध्या ८३ हजार ८२६ कोरोनाबाधित असून त्यातील ७० हजार ६१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, एक हजार ४६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु, सध्या महापालिका हद्दीत रोजच्या रोज पंधराशे ते सतराशे नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यातही आता मागील महिनाभरापासून ठाण्यात ज्येष्ठांसह आता लहान मुलांनादेखील कोरोनाची बाधा होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता लहान मुलांना कोरोनापासून रोखण्यासाठी मोठे आव्हान उभे ठाकले आहे. शाळा बंद असल्या तरी घरात राहणारी मुले खेळण्यासाठी बाहेर पडत आहेत. उद्यानात जात आहेत, त्यामुळे त्यांना अधिक प्रमाणात संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुलांना घरीच ठेवण्याचे आवाहन आता करण्यात येत आहे. पालकांनी स्वत:बरोबर मुलांची काळजी घ्यावी, असेही सांगण्यात येत आहे.ठाण्यात १ मार्च ते २ एप्रिल २०२१ या कालावधीत ० ते ५ वयोगटांतील २१०, ६ ते १० वयोगटांतील ३४४ आणि ११ ते १५ या वयोगटांतील ४२९ मुलांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, एकूण ९८३ मुलांपैकी ४७४ मुलांवर उपचार सुरू आहेत. तर, ५०९ मुलांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ११ ते १५ वयोगटांतील ४२९ मुलांना कोरोनाची लक्षणे आढळली. या वयोगटांतील मुले सध्या सुटी असल्याने बाहेर पडत आहेत. यातून त्यांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनामुळे सध्या बागबगिचे, उद्याने बंद आहेत. पण, असे असताना अनेक लहान मुले उद्यान आणि बगिचात खेळत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पालकांनी आता मुलांची जास्त काळजी घेणे गरजेचे असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.एकत्र खेळण्यामुळे झाला परिणामआधी लॉकडाऊन असल्याने मुले जास्त प्रमाणात बाहेर पडत नव्हती. परंतु, आता खेळायला बाहेर पडून उद्यानातदेखील जात हाेती. याशिवाय, कोरोनाच्या दुस:या लाटेत घरातील एकाला कोरोनाची बाधा झाली, तर घरातील इतर मंडळीदेखील बाधित होत असून यात मुलेही बाधित होत आहेत. लहान मुलांमध्ये कोरोनाची बाधा अधिक वाढताना दिसत आहे.     - डॉ. संतोष कदम,   बालरोगतज्ज्ञ व      अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन , ठाणे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या