Anupamaa : साध्याभोळ्या ‘अनुपमा’चं ग्लॅमरस फोटोशूट, रूपाली गांगुलीनं डब्बू रत्नानीला दिल्या हटके पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 05:09 PM2022-05-13T17:09:00+5:302022-05-13T17:11:39+5:30

Anupamaa, Rupali Ganguly : मालिकेत लग्नाची धामधूम; सोशल मीडियावर अनुपमाच्या ग्लॅमरस फोटोंचा धुमाकूळ

tv anupama actress rupali ganguly sizzling photoshoot for dabboo ratnani | Anupamaa : साध्याभोळ्या ‘अनुपमा’चं ग्लॅमरस फोटोशूट, रूपाली गांगुलीनं डब्बू रत्नानीला दिल्या हटके पोझ

Anupamaa : साध्याभोळ्या ‘अनुपमा’चं ग्लॅमरस फोटोशूट, रूपाली गांगुलीनं डब्बू रत्नानीला दिल्या हटके पोझ

Next

टीव्हीच्या दुनियेत टीआरपी चार्टवर आपला दबदबा कायम ठेवणारी मालिका कोणती तर ‘अनुपमा’ (Anupamaa). या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. कथा दमदार आहेच पण मालिकेची स्टारकास्टही तितकीच दमदार आहे. अनुपमाची भूमिका साकारते आहे ती अभिनेत्री रूपाली गांगुली (Rupali Ganguly). वनराजच्या रोलमध्ये आहे सुधांशू पांडे आणि काव्याचा निगेटीव्ह रोल साकारला आहे तो मदालसा शर्मा हिने. कहाणीच्या अनुषंगाने एक एक पात्र अगदी विचारपूर्वक निवडलं आहे.
 ‘अनुपमा’ या मालिकेचा आत्मा आहे आणि  ही भूमिका रूपालीने अगदी बेमालुमपणे साकारली आहे. अ‍ॅक्टिंगसोबतच रूपाली गांगुली सोशल मीडियावरही प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. सध्या चर्चा आहे ती फोटोशूटची. होय,तिकडे मालिकेत अनुपमा व अनुजच्या हळदीची धामधूम सुरू आहे आणि सोशल मीडियावर अनुपमाच्या ग्लॅमरस फोटोशूटनं धुमाकूळ घातला आहे.

अनुपमा अर्थात रूपालीनं सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानीसाठी नुकतंच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रूपालीच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्सही केल्या आहेत. हार मर जावां, अशी कमेंट एकाने केली आहे तर मार ही डालेगी आप..., असं एकाने लिहिलं आहे.

रूपाली गांगुली सध्या टीव्हीची महागडी अभिनेत्री आहे. फीच्या बाबतीत रूपालीने टीव्हीच्या अनेक लोकप्रिय चेहºयांना मागे टाकलं आहे. अनुपमाच्या एका एपिसोडसाठी ती 3 लाख रूपये मानधन घेते. रूपालीला आता राम कपूर व रोनित रॉय बोस यांच्यापेक्षाही अधिक मानधन दिलं जात आहे.  रूपालीला तुम्ही याआधी साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत पाहिलं असेल. बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्येही ती सहभागी झाली होती. पहिल्या चार वर्षात रुपाली गांगुलीने पाच मालिकांमध्ये काम केलं. मात्र यापैकी एकही मालिका सहा महिने देखील चालली नाही. दरम्यान साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली आणि तिच्या करियरला कलाटणी मिळाली.


 
रुपाली गांगुलीने 2000 साली सुकन्या या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने दिल है की मानता नही, जिंदगी तेरी मेरी कहानी, भाभी, काव्यांजली या मालिकांमध्ये काम केलं. 
मात्र यातील एकही मालिका फारशी कमाल दाखवू शकली नाही. त्यामुळे रुपालीवर फ्लॉप अभिनेत्रीचा टॅग लागला गेला. तिला कामही मिळणं बंद झालं होतं. त्याच काळात तिने संजीवनी या मालिकेत काम केलं. ही मालिका सुपरहिट ठरली पण यात रुपाली सहाय्यक भूमिकेत होती. अनुपमा या मालिकेनं मात्र तिचं नशीब बदललं.

Web Title: tv anupama actress rupali ganguly sizzling photoshoot for dabboo ratnani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app