आत्महत्येच्या एक दिवस आधी तुनिषा शर्माने आईला सांगितली होती तिची अवस्था, म्हणाली मला शिजान.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 19:48 IST2022-12-26T14:00:22+5:302022-12-26T19:48:32+5:30
आत्महत्या करण्याच्या एक दिवस आधी तुनिषानं आपली अवस्था आईला सांगितली होती. तुनिषाच्या आईनं अनेकवेळा शिजानशी अनेकवेळा संपर्क साधला होता, पण,

आत्महत्येच्या एक दिवस आधी तुनिषा शर्माने आईला सांगितली होती तिची अवस्था, म्हणाली मला शिजान.....
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) शूटिंग सेटवरच गळफास लावून आत्महत्या केल्याने टेलिव्हिजन क्षेत्रात खळबळ माजली आहे. २४ डिसेंबरला अभिनेत्रीने ‘अली बाबा दास्तान ए काबुल’ (Ali Baba: Dastaan-E-Kabul)च्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर तुनिशाच्या आईने तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता शिजान खान (Sheezan Mohammad Khan) वर गंभीर आरोप केले आहेत.आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिजान विरोधात एफआयआर दाखल करत त्याला अटक केली आहे.
15 दिवसांपूर्वी शीजानचे त्याच्याशी ब्रेकअप झाले होते. आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी तुनिषाने तिच्या आईशी झालेल्या संवादात शिजानबद्दल तिची तळमळ व्यक्त केली होती.
एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, मला शिजाना हवायं. आई मला तुला माझ्या मनातली गोष्ट सांगायची आहे. मला तो माझ्या आयुष्यात परत हवा आहे, पण तो ऐकायला तयार नाही, तु बोलशील का एकदा शिजानशी. यानंतर तुनिषाची आई शिजानशी बोलली होती आणि तुनिषाच्या आयुष्यात परत येण्यास देखील सांगितलं होतं. पण शिजाननं स्पष्ट शब्दांत नकार दिला होता.
तुनिषाच्या आईने सांगितले, ती याबाबत शिजानच्या आईशीही बोलली होती आणि की जर त्याला तुनिषासोबत असंच वागायचं होतं तर तो तिच्या आयुष्यात का आला? तेव्हा शिजानची आई तुनिषाच्या आईला म्हणाली, यात मी काय बोलू? दोघांनीही एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. आता काय झाले ते फक्त शिजनच सांगू शकेल. तुनिषाच्या आईनं शिजानशी अनेकवेळा संपर्क साधला होता आपल्या मुलीला असं फसवायचंच होतं मग तू तिच्या जवळ आलाच कशाला? माझ्या मुलीचं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस? असा जाब शीजानला विचारला होता, असंही तुनिषाच्या आईनं सांगितलं.
तुनिषाची आई म्हणाली, “माझी मुलगी आता माझ्यासोबत नाही. मी तिला गमावले. शिजनला कठोर शिक्षा व्हावी, अशी माझी मागणी आहे. माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. ते त्याची चौकशी योग्य करतील आणि ते करत आहे.”