आई कुठे काय करते: मायलेकीची बिंधास्त जोडी; अनघा आणि तिच्या आईचा डान्स पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 13:30 IST2022-01-11T13:30:00+5:302022-01-11T13:30:00+5:30
Aai kuthe kay karte: अनघा आणि तिच्या ऑनस्क्रीन आईचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही मायलेकीची जोडी भन्नाट डान्स करताना दिसत आहे.

आई कुठे काय करते: मायलेकीची बिंधास्त जोडी; अनघा आणि तिच्या आईचा डान्स पाहिलात का?
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (Aai kuthe kay karte). सध्या या मालिकेत देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. अभि आणि अनघा या दोघांचा नुकताच थाटामाटात लग्नसोहळा पार पडला आहे. विशेष म्हणजे हा लग्नसोहळा विशेष गाजला. अगदी यात कलाकारांनी परिधान केलेल्या कपड्यांपासून ते त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या रिल्स वा व्हिडीओपर्यंत. प्रत्येक गोष्टीची तुफान चर्चा रंगली. या चर्चांमध्ये अनघा आणि तिच्या ऑनस्क्रीन आईचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही मायलेकीची जोडी भन्नाट डान्स करताना दिसत आहे.
सध्या सोशल मीडियावर अनघा आणि आशा या दोघींचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या दोघींना विशाखानेही साथ दिली आहे. या व्हिडीओमध्ये या तिघी जणी सजना या गाण्यावर डान्स करतांना दिसत आहेत.
दरम्यान, या तिघींच्या व्हिडीओला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. त्यातच अनघाने नऊवारी साडी नेसून हा डान्स केल्यामुळे तो प्रेक्षकांना भावत आहे. या मालिकेत अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे, विशाखाची भूमिका पूनम चांदोरकर साकारत आहे. तर, अनघाची आई आशा ही भूमिका शलाका पवार वठवत आहेत.