आई कुठे काय करते : अरुंधतीच्या रिअल लाइफ मुलीविषयी माहितीये का? पाहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 14:46 IST2021-09-09T14:43:08+5:302021-09-09T14:46:17+5:30
Madhurani gokhale-prabhulkar: मधुराणी पडद्यावर तीन मुलांच्या आईची भूमिका साकारत आहे. मात्र, तिच्या खऱ्या आयुष्यातील मुलांविषयी फार कमी जणांना ठावूक आहे.

आई कुठे काय करते : अरुंधतीच्या रिअल लाइफ मुलीविषयी माहितीये का? पाहा तिचे फोटो
छोट्या पडद्यावर सध्या तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित ही मालिका असून अरुंधती या पात्राभोवती मालिकेचं संपूर्ण कथानक फिरताना दिसतं. या मालिकेतील अरुंधतील ही भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर साकारत असून तिच्या अभिनयामुळे अनेकांची मनं जिकंली आहेत. विशेष म्हणजे मधुराणी पडद्यावर तीन मुलांच्या आईची भूमिका साकारत आहे. मात्र, तिच्या खऱ्या आयुष्यातील मुलांविषयी फार कमी जणांना ठावूक आहे. म्हणूनच, अनेकदा मधुराणीची रिअल लाइफ मुलं कोण असा प्रश्न चाहत्यांना पडत असतो.
अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली मधुराणी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. अनेकदा ती इन्स्टाग्रामवर तिच्या कुटुंबियांसोबतचे काही फोटो शेअर करत असते. यात तिच्या मुलांचाही समावेश असतो.
Ganesh Festival 2021: सासू-सुनेची झक्कास जोडी! मेघाने पहिल्यांदाच शेअर केला 'बिग बॉस'सोबतचा व्हिडीओ
'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणीला खऱ्या जीवनात एक लहान मुलगी आहे. या मुलीसोबतचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. मधुराणीच्या मुलीचं नाव स्वराली असून ती शाळेत जाते.
मधुराणी आणि प्रमोद प्रभुलकर यांच्या लाडक्या लेकीचं नाव ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी ठेवलं आहे. या नावामागेदेखील एक रंजक किस्सा आहे. सुंदर माझं घर या चित्रपटात मधुराणीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. सोबतच तिने संगीत दिग्दर्शनही केलं होतं. विशेष म्हणजे या चित्रपटातील गाणी दिलीप प्रभावळकर यांना विशेष आवडली त्यामुळे ते सेटवर मधुराणीला स्वराली म्हणायचे. इतकंच नाही तर तुम्हाला मुलगी झाल्यावर तिचं नाव स्वराली ठेवा असंही त्यांनी मधुराणीला सांगितलं होतं. त्यानंतर मधुराणीने तिच्या मुलीचं नाव स्वराली असं ठेवलं आहे.
दरम्यान, मधुराणी गोखले ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून जाहिरात क्षेत्रापासून तिने करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर हळूहळू तिचा प्रवास मोठ्या पडद्याकडे झाला. आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक मालिका, नाटक, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.