Ganesh Festival 2021: सासू-सुनेची झक्कास जोडी! मेघाने पहिल्यांदाच शेअर केला 'बिग बॉस'सोबतचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 12:37 PM2021-09-09T12:37:51+5:302021-09-09T12:38:19+5:30

Megha dhade: अभिनयाप्रमाणेच स्वयंपाकाची विशेष आवड असणाऱ्या मेघाचं Megha's Magic हे युट्यूब चॅनेल असून यात ती तिच्या काही हटके रेसिपीज् शेअर करत असते.

marathi actress megha dhade share Ganesh Festival special Easy Steamed Modak Recipe | Ganesh Festival 2021: सासू-सुनेची झक्कास जोडी! मेघाने पहिल्यांदाच शेअर केला 'बिग बॉस'सोबतचा व्हिडीओ

Ganesh Festival 2021: सासू-सुनेची झक्कास जोडी! मेघाने पहिल्यांदाच शेअर केला 'बिग बॉस'सोबतचा व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्देमेघाने पहिल्यांदाच सासूबाईंसोबत शेअर केला रेसिपी व्हिडीओ

'बिग बॉस मराठी'चं पहिलं पर्व गाजवणारी अभिनेत्री म्हणजे मेघा धाडे.  बिग बॉसच्या घरात कायम उत्साहाचं वातावरण निर्माण करणारी मेघा खऱ्या आयुष्यातदेखील तितक्याच उत्साहाने सगळ्या कामात सहभाग घेत असते. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचं वातावरण असल्यामुळे मेघादेखील गणरायाच्या आगमनच्या तयारीला लागली असून तिने पहिल्यांदाच घरातील बिग बॉस सोबतच म्हणजेच तिच्या सासूबाईंसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

अभिनयाप्रमाणेच स्वयंपाकाची विशेष आवड असणाऱ्या मेघाचं Megha's Magic हे युट्यूब चॅनेल असून यात ती तिच्या काही हटके रेसिपीज् शेअर करत असते. विविध पद्धतीचे खादपदार्थ दाखवल्यानंतर मेघाने खास गणेशोत्सवानिमित्त उकडीच्या मोदकांची रेसिपी खवैय्यांसोबत शेअर केली आहे.

बाथटबमध्ये बसून वहिनीसाहेबांचं हटके व्हिडीओ शूट; पाहा धनश्रीचा स्वॅग

मेघाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या सासूबाईंनी उकडीचे मोदक कसे करावेत याची रेसिपी सांगितली आहे. विशेष म्हणजे मेघाने तिच्या सासूबाईंचा उल्लेख सासूआई आणि घरच्या बिग बॉस असा केला आहे.


 

दरम्यान, कलाविश्वामध्ये सक्रीय असणारी मेघा सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टीव्ह आहे. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र, यावेळी गणेशोत्सव असल्यामुळे या दिवसांशी संबंधित अनेक पोस्ट ती शेअर करताना दिसत आहे.

Web Title: marathi actress megha dhade share Ganesh Festival special Easy Steamed Modak Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.