मालिकेच्या सेटवर अभिनेत्याने केला अक्षयाचा पाठलाग; सोशल मीडियावर शेअर केला Video

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 05:03 PM2021-09-30T17:03:55+5:302021-09-30T17:05:05+5:30

Akshaya Naik: 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत लतिका ही भूमिका साकारत अक्षयाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

marathi actress latika aka Akshaya Naik share video on instagram | मालिकेच्या सेटवर अभिनेत्याने केला अक्षयाचा पाठलाग; सोशल मीडियावर शेअर केला Video

मालिकेच्या सेटवर अभिनेत्याने केला अक्षयाचा पाठलाग; सोशल मीडियावर शेअर केला Video

googlenewsNext
ठळक मुद्दे या व्हिडीओमध्ये तिने तिच्या दरवाजा बाहेर कोणी तरी उभं असल्याचं सांगितलं आहे. 

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अक्षयाने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका अभिनेत्याने तिचा पाठलाग केल्याचं तिने म्हटलं आहे.सध्या अक्षयाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत लतिका ही भूमिका साकारत अक्षयाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे मालिका सुरु झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच अक्षयाच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळेच अक्षयादेखील चाहत्यांसोबत अनेक गोष्टी शेअर करत असते. यामध्येच तिने इन्स्टाग्रामवर सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या दरवाजा बाहेर कोणी तरी उभं असल्याचं सांगितलं आहे. 

Bigg boss marathi 3 : दादूसच्या पत्नीचे 'हे' लय भारी Photos पाहिलेत का? सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रीपेक्षा नाही कमी

"गेल्या काही वेळापासून माझ्या रुमच्या बाहेर कोणी तरी उभं आहे असं मला सतत जाणवतंय. त्यामुळेच मी हा व्हिडीओ काढतीये. कारण, तुमच्याकडे काही तरी प्रूफ असावा", असं अक्षया शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणत आहे. यात अक्षयाने व्हिडीओ सुरु असतानाच दरवाजा उघडला आणि तिच्यासमोर धाडकन अभिनेता समीर परांजपे आला. समीरला पाहिल्यावर अक्षया प्रचंड घाबरली. मात्र, समीरने हे मुद्दाम तिला घाबरवण्यासाठी केल्याचं समोर आलं.

दरम्यान, समीर आणि अक्षया कायम सेटवर अशी मज्जामस्ती करत असतात. अनेकदा ते इन्स्टाग्रामवर सेटवरील काही व्हिडीओही शेअर करत असतात.  यात अनेकदा त्यांच्या डान्सचे किंवा इन्स्टा रिलचे व्हिडीओ असतात.
 

Web Title: marathi actress latika aka Akshaya Naik share video on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.