'टाईमप्लीज' ते 'सुख म्हणजे...' ११ वर्षात कमालीची बदलली आहे गौरी; पाहा तिचा Then & Now Look
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 19:15 IST2023-03-01T19:14:40+5:302023-03-01T19:15:44+5:30
Girija prabhu: मालिका विश्वामध्ये हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या गिरीजाने काही गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

'टाईमप्लीज' ते 'सुख म्हणजे...' ११ वर्षात कमालीची बदलली आहे गौरी; पाहा तिचा Then & Now Look
'सुख म्हणजे नक्की काय असतं' (sukh mhanje nakki kay asta) ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर तुफान गाजत आहे. उत्तम कथानक आणि त्याला साजेसा कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. त्यातही अभिनेत्री गिरीजा प्रभू(girija prabhu) हिला विशेष पसंती मिळत असल्याचंही पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर गिरीजाचे असंख्य चाहते आहेत त्यामुळे दररोज तिच्याविषयी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यातच तिचे काही जुने फोटो व्हायरल झाले आहेत.
मालिका विश्वामध्ये हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या गिरीजाने काही गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यातलाच एक 'टाइम प्लीज'. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात गिरीजाने बालकलाकार म्हणून काम केलं होतं. तसंच काही जाहिरातींमध्येही ती झळकली होती. यावेळचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. विशेष म्हणजे गिरीजामध्ये आता कमालीचा बदल झाला असून तिचे जुने फोटो पाहून तिला ओळखणंही कठीण आहे.
गि
रीजाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने दोन वेण्या घातल्याचं दिसून येत आहे. तिचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, गिरीजाने 'सुख म्हणजे नक्की काय असतं?' या मालिकेपूर्वी 'कौल मनाचा', 'काय झालं कळंना' , 'सेंट मेरी मराठी मिडीयम', 'डॅड चिअर्स' , 'तुझा दुरावा' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर एका शॉर्टफिल्ममध्येही ती झळकली आहे. इतकंच नाही तर तिने ‘युवा डान्सिंग क्वीन’ या रिअॅलिटी शो मध्ये भाग घेतला होता. तर महाराष्ट्राची श्रावण क्वीन (2019) या स्पर्धेत तिने तिसरा क्रमांक मिळवला होता.