मोठी बातमी; अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी भाजपाचे नवे जिल्हाध्यक्ष

By Appasaheb.patil | Updated: August 30, 2022 17:54 IST2022-08-30T17:54:41+5:302022-08-30T17:54:51+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

big news; Akkalkot MLA Sachin Kalyanshetty is the new district president of BJP | मोठी बातमी; अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी भाजपाचे नवे जिल्हाध्यक्ष

मोठी बातमी; अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी भाजपाचे नवे जिल्हाध्यक्ष

सोलापूर : भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवड करण्यात आली. भाजपामधील युवा आमदाराला जिल्हाध्यक्ष पद मिळाल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. सचिन कल्याणशेट्टी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात.

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे एका महिलेच्या प्रकरणात अडकल्याने त्यांना तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून भाजपचे जिल्हाध्यक्ष पद रिक्त होते. त्यानंतर मंगळवारी दुपारी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र काढून सचिन कल्याणशेट्टी यांच्या निवडीविषयी जाहीर केले. 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे ते समजले जातात. माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्याही ते जवळचे आहेत. अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावचे सरपंच, भारतीय जनता पार्टीचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष त्यानंतर आमदार आणि आता जिल्हाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. सध्या राज्याच्या मंत्रीपदाच्या शर्यतीतही त्यांचे नाव आघाडीवर घेतले जाते. 

Web Title: big news; Akkalkot MLA Sachin Kalyanshetty is the new district president of BJP