कणकवली : जिल्ह्यातील विविध प्रकल्प बंद करू असे म्हणणाऱ्या नवनिर्वाचित खासदारांनी आधी कार्यपद्धती समजून घ्यावी. राज्याच्या नियोजनात हस्तक्षेप करण्याचा त्यांना काय अधिकार आहे, असा सवाल करतानाच विकासकामांत ढवळाढवळ खपवून घेणार नाही, असा इशारा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज, बुधवारी दिला. विकासकामे बंद करायला निघालेल्या विनायक राऊत यांनी येथील युवकांसाठी नोकरी-धंद्याची व्यवस्था कशी करायची ते सांगावे.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर उपस्थित होते. काँग्रेस पदाधिकाऱ्यांमधून व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया तसेच भाष्य हा आमचा अंतर्गत विषय आहे. असे सांगून राणे म्हणाले, मंगळवारच्या ओसरगाव येथील बैठकीनंतर पक्षातंर्गत मतभेदाचा प्रश्न संपुष्टात आला आहे. आता कोणाचीही तक्रार शिल्लक राहणार नाही, असा विश्वास मला वाटतो. काँग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेत जाऊन जोमाने काम करतील. जो कोणी बेशिस्तपणे वागेल त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, असेही मंत्री राणे म्हणाले. (वार्ताहर)काँग्रेस स्वबळावर लढू शकतेकाँग्रेसचा पाया मजबूत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढू शकते. त्यामुळे आम्हाला इतर कोणतेही पक्ष स्वबळाची भाषा करीत असली तरी बोलून दाखवावे लागत नाही. माणूस घाबरतो, तेव्हा तो पुन्हा पुन्हा बोलत असतो, असा टोलाही मंत्री राणे यांनी कोणाचे नाव न घेता यावेळी लगावला.
विकासकामे बंद करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला
By admin | Updated: July 10, 2014 00:30 IST