शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

वहाळ ग्रामस्थांच्या एकोप्यापुढे दारूचीही काय बिशाद ?

By admin | Updated: March 1, 2015 23:16 IST

चिपळूण तालुका : पन्नास वर्षे झालेला एक निश्चय अन् ध्यास--तंटामुक्त अभियान

मेहरून नाकाडे-  रत्नागिरी  -चिपळूण तालुक्यातील नऊ मोठ्या व दोन पोटवाड्यांतर्गत वसलेले २ हजार ५११ लोकवस्तीचे ‘वहाळ’ गाव. गावामध्ये गणेशोत्सव, शिमगोत्सवाबरोबर प्रत्येक सण लोक सहभागातून आनंदाने साजरे केले जातात. शिवाय कोणताही निर्णय असो सामोपाचारने निर्णय घेणे व संपूर्ण गावाने त्याची एकजुटीने अंमलबजावणी करणे जणू वहाळ गावाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. ग्रामपंचायत स्थापनेपासून निवडणुका बिनविरोध पार पाडल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर ५० वर्षे गावात दारूबंदी करण्यात आली आहे. म्हणून वहाळ गावाची तंटामुक्त पुरस्कारासाठी (२०१३-१४) निवड झाली आहे.महात्मा गांधी तंटामुक्त अभियान २००७ साली सुरू करण्यात आले त्यावेळेपासूनच गावात तंटामुक्त अभियान राबवण्यात येत आहे. गावातील शांतता जपण्यासाठी तंटामुक्त समिती दरवर्षी स्थापन करण्यात येते. शिवाय नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी दरवर्षी समितीची कार्यकारिणी बदलण्यात येते. शासकीय असो वा सांस्कृतिक प्रत्येक उपक्रमात ग्रामस्थ एकजुटीने सहभागी होतात. गावामध्ये तंटे होऊ नयेत, यासाठी समिती कार्यरत आहे. शिवाय किरकोळ एखादा तंटा उद्भवलाच, तर समिती एकत्र येऊन वाद सामोपचाराने मिटवते. पक्षकारही समितीने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करतात.गावामध्ये ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात आले असून, गावातील दहा व्यक्तींची त्यामध्ये निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीतर्फे या मंडळींसाठी विशेष पोशाख पुरवण्यात आले आहेत. गावामध्ये कोणताही कार्यक्रम असो वा उत्सव त्या कालावधीत कोठेही शांततेला गालबोट लागणार नाही किंबहुना शांतता प्रस्थापित करण्यासाठी ग्रामसुरक्षा दल कार्यरत असते. सण, उत्सवावेळी पोलीस बंदोबस्त असला तरी ग्रामसुरक्षादलाचे प्रतिनिधी आपापली जबाबदारी प्राधान्याने निभावतात.वहाळ गावाने सफाई कामगार नियुक्त केले आहेत, शिवाय वाडीवार कचराकुंड्या बसवल्या आहेत. कचरा गोळा केल्यानंतर घनकचऱ्यापासून खतनिर्मिती केली जाते. सुरूवातीला गावातील मंडळींना खत देण्यात येत होते. मात्र, ग्रामपंचायतीने सार्वजनिक क्षेत्रात आंबा काजू व अन्य फळांची एक हजार झाडे लावली आहेत. अडीच वर्षांच्या झाडांचे संगोपन व देखभाल सुरू आहे. खताचा वापर या झाडांसाठी केला जातो.गावाच्या एकूण लोकसंख्येपैकी निम्मी मंडळी गावात राहतात. परंतु, निम्मी मंडळी मुंबई व अन्य शहरात वास्तव्यास आहेत. सणासुदीला संबंधित मंडळी गावी परतते. परंतु ग्रामदेवता श्री वाघजाई देवीच्या मंदिरात ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयास सर्व मंडळी संमती दर्शवतात.आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याचा स्वीकार गावकरी मंडळी करतात. त्यांना कोणताही विरोध दर्शवला जात नाही. शिवाय गावामध्ये ७ ते ८ नमन मंडळे आहेत. मंडळाकडून कोणालाही सक्ती करण्यात येत नाही. स्वेच्छेने सहभागी होणाऱ्यांनाच सहभागी करून घेण्यात येते. प्लास्टिक मुक्ती अभियान, स्वच्छता अभियानाबरोबर गावात ५० वर्षांपूर्वी केलेली दारूबंदी आजही कायम आहे.गावामध्ये ग्रामपंचायतीची स्थापना १९५७ साली झाली. तेव्हापासून ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध सुरू आहेत. गावपॅनेलचे वर्चस्व आहे. अन्य सार्वत्रिक निवडणुकीवेळी मात्र एकमुखी निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे गावात शांतता नांदत आहे. ग्रामस्थांच्या निर्णयाला मुंबईकरही संमती दर्शवत आहेत.- संजय महादेव शेलार, सरपंच ग्रामपंचायत, वहाळप्रत्येक सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ग्रामस्थांचा सहभाग उल्लेखनीय असतो. बचतगटांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवण्यात येतात. शिवाय प्लास्टिक मुक्ती, स्वच्छता अभियानातही महिलांचा सहभाग असतो. त्यामुळे कोणतीही शासकीय योजना असो वा कार्यक्रम ग्रामस्थांच्या सहभागामुळे सर्वसामान्यांपर्यत पोहोचवणे सुलभ होते.- जान्हवी मंदार आंबेकर, ग्रामसेविका.गावामध्ये तंटे उद्भवतच नाही, किरकोळ तंटा उद्भवला तरी गावपातळीवरच सोडवले जातो. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ग्रामसुरक्षा दलाचे कामही उत्कृष्ट आहे. दारूबंदीचा निर्णय ५० वर्षांपूर्वी घेण्यात आला होता, अद्याप हा निर्णय कायम आहे. शिवाय व्यसनमुक्तीसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमही राबवण्यात येते.- आनंदा सकपाळ,अध्यक्ष तंटामुक्त समिती, वहाळगावामध्ये १०० टक्के तंटामुक्ती असल्याने शांतता नांदते आहे. एखादी समस्या उद्भवलीच तर ती सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. गेली १६ वर्षे पोलीसपाटील म्हणून कार्यरत आहे. गावात कोणतेही वाद उद्भवलेले नाहीत. आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याला स्वीकारले जाते. छोट्या मोठ्या कारणावरून वाद होत नाहीत. - रामजी महादेव पवार, पोलीसपाटील, वहाळ