शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजननासाठी इंजेक्शनचा वापरमत्स्योत्पादन वाढणार :

By admin | Updated: July 25, 2014 22:50 IST

सद्य स्थितीत गरजेचा प्रयोग

रत्नागिरी : गोड्या पाण्यातील माशांना प्रजननासाठी प्रेरित करण्याकरिता चक्क इंजेक्शनचा वापर केला जात आहे. माशांचे बिजोत्पादन व मत्स्योत्पादन वाढविण्यासाठी इंजेक्शनचा वापर करण्यात येत आहे.रत्नागिरी जिल्ह्याला १५७ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. मासेमारी प्रामुख्याने समुद्रात होत असली तरी नदीपात्रातील गोड्या पाण्यात मासेमारी केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यात त्याचे अल्प आहे. जुलैमध्ये पाऊस झाल्याने नदीपात्र भरली आहेत. नदीपात्रातही अ‍ॅक्वेलिंग प्रक्रिया होते. मासे पावसाचे तुषार झेलण्यासाठी उथळ पात्रात येतात. नदीपात्रात मासे अंडी घालतात. जून ते आॅगस्ट हा माशांच्या प्रजननाचा काळ ओळखला जातो. मात्र, सध्या नद्यांची परिस्थितीही विदारक दिसून येत आहे. काही नद्यांच्या ठिकाणी मगरींचा वावर आहे, तर काही नद्यांमध्ये रेती उत्खनन सुरू असल्याचा प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम बिजोत्पादन व मत्स्योत्पादनावर होत आहे. प्रा. डॉ. हिरालाल चौधरी व डॉ. के. एच. अलिकुन्ही यांनी ओरिसा येथे १० जुलै १९५७ साली कटक माशाला इंजेक्शन देऊन प्रजननासाठी प्रेरित केले. संबंधित प्रयोग यशस्वी झाल्यानंतर १० जुलै ‘राष्ट्रीय मत्स्यदिन’ साजरा करण्यात येऊ लागला. मात्र, डॉ. चौधरी व डॉ. अलिकुन्ही यांचा प्रयोग सध्याच्या स्थितीत गरजेचा बनला आहे. नदीपात्रातील रोहू, कटला, रिगल या माशांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे घटणारे मत्स्योत्पादन वाढविण्यासाठी बिजोत्पादन वाढविणे गरजचेचे आहे. रायगड येथे ३ खासगी व ठाणे तलासरी येथे शासकीय एक बिजोत्पादन केंद्र मिळून चार केंद्र आहेत. प्रजननासाठी प्रेरित करणाऱ्या नर व मादी तत्सम् जातीच्या माशांना एका टँकमध्ये सोडले जाते. त्याठिकाणी कृत्रिम तुषार निर्माण करून पावसाळी वातावरण तयार केले जाते. नंतर ‘ओव्हा प्रिम’सारखे इंजेक्शन नर व मादीला देऊन प्रजननासाठी प्रेरित केले जाते. जेणेकरून घटणारे मत्स्योत्पादन, बिजोत्पादन टिकविण्यास मदत होते.बहुतांश नद्या गाळाने भरल्या आहेत. काही नदीपात्र तर संपुष्टात आली आहेत. बहुतांश नद्यांमध्ये मगरींचा वावर दिसून येतो. एकूणच प्रतिकूल परिस्थितीत मत्स्योत्पादन व त्याचे बिजोत्पादन टिकविण्यासाठी इंजेक्शनचा वापर सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बिजोत्पादन केंद्र नसल्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा अभ्यासवजा प्रयोग दाखविण्यासाठी जिल्ह्याबाहेर नेले जात आहे. (प्रतिनिधी)घटलेले मत्स्योत्पादन वाढविणे किंवा त्यांचे बीज वाढविणे काळाची गरज आहे. त्यामुळे शास्त्रीयदृष्ट्या पूर्ण अभ्यास करून इंजेक्शन प्रक्रियेचा अवलंब केला जात आहे. वास्तविक ही पध्दत जुनी व सर्वदृढ आहे. त्यामुळे बीजोत्पादन केंद्रात बीजनिर्मितीसाठी त्याचा वापर केला जात आहे. - प्रा. विजय जोशी, डीन, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी-बिजोत्पादनासाठी नवा पर्याय-गोड्या पाण्यातील मासेमारी वाढण्यासाठी नवा उपाय-रोजगाराची मोठी संधी मिळणार-पावसाळी हंगामात मोठा व्यवसाय उभा करता येणे शक्य-रेती उत्खननाचा बिजोत्पादनावर होणाऱ्या दुष्परिणामांवरही पर्याय-रत्नागिरीत बिजोत्पादन केंद्र नाही, विद्यार्थी प्रशिक्षण बाहेरच