शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

आंबा उत्पादनात तुडतुड्याची समस्या

By admin | Updated: December 28, 2015 00:36 IST

मोहोर संरक्षण गरजेचे : कोकणातील कीटकनाशकांच्या सहा फवारण्या प्रमाणित

आंबा पिकाला उत्पादनामध्ये मोहोरावर येणारे तुडतुडे ही अतिशय महत्त्वाची समस्या आहे. परंतु, अलिकडच्या काही वर्षामध्ये मोहोरावर येणाऱ्या तुडतुड्याची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे आंबा बागा धोक्यात आहेत. ही कीड भारतात सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळते. परंतु, कोकणात ही कीड अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात येऊ लागली आहे. तिचे नियंत्रण करणे कठीण होऊ लागले. याची कारणे पूर्वेतिहास व अलिकडील सध्याची परिस्थिती याचा आढावा कोकणातील आंबापीक संरक्षणाच्या दृष्टीने पाहिल्यास बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकेल. महाराष्ट्रात कोकण विभागातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातव्यावसायिकदृष्ट्या आंबा लागवड पूर्वीपासून केली जाते. कोकणात हापूस या एकाच जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केल्यामुळेव आंबा हेच फळपीक उत्पादनाचे मुख्य साधन असल्याने बागायतदारांना तुडतुड्यांमुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचे फवारे पूर्वीपासून मारले जात होते. कोकणासाठी कीटकनाशकांच्या सहा फवारण्या प्रमाणित करण्यात आल्या आहेत. परंतु, काही शेतकरी १० ते १२ कीटकनाशकांच्या फवारण्या करतात, असे आढळून आले आहे. साधारण २५ ते ३० वर्षांपूर्वी कोकणातही २ ते ३ फवारण्या केल्या जात होत्या व त्यामुळे तुडतुड्यांचे व्यवस्थापन नीट होत होते. कार्बारिल व एन्डोसल्फान ही दोनच कीटकनाशके वापरली जात होती. मात्र, १९८१-८२ साली कार्बारीलची फवारणी करुनही तुडतुडे मोठ्या प्रमाणात आले व आंबा फळपिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कारण विभागामध्ये अ‍ॅब्रिटोडस अ‍ॅटकिनसोनी ही तुडतुड्याची जात होती ती कमी होऊन कीटकनाशकास मुळातच जास्त प्रतिकारक्षम असलेले आईडिओस्कोपस निव्हीओस्पायसस ही जात मोठ्या प्रमाणात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी सिथेटिक पायरेथ्राईड गटाची कीटकनाशके प्रभावी आढळून आल्याने त्यांचा अंतर्भाव फवारणीत सुचित करण्यात आला. मात्र, या कीटकनाशकाचा एकच फवारा देण्याचे नमूद करण्यात आले होते व इतर कीटकनाशके ही अदलूनबदलून वापरावीत. त्यामुळे तुडतुड्यामध्ये कीटकनाशकाची प्रतिकारक्षमता निर्माण होणार नाही, याची काळजी फवारणी सुचवताना घेण्यात आली होती. परंतु, आंबा बागायतदारांनी जाणता-अजाणता फवारणी सूचीनुसार कीटकनाशकाचा वापर केला नाही. तसेच कीटकनाशके मोजून न घेणे अदलूनबदलून वापर न करणे, कीटकनाशके एकमेकात मिसळून वापरणे, यामुळे तुडतुड्याची प्रतिकारक्षमता वाढली. तसेच कीटकनाशकाचा वापर अतिप्रमाणात झाल्यामुळे शत्रुकिडीवर उपजीविका करणारे इतर मित्रकीटकांचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे कमी नुकसानकारक कीडीही मोठ्या प्रमाणात वाढून आंबा पिकाचे नुकसान करू लागल्या. त्या शत्रुकिडीमध्ये प्रामुख्याने मोहोरावरील मिजमाशी, पिठ्या ढेकूण, फुलकिडे, तांबडा कोळी, फळपोखरणारी अळी व खवले कीड आदी समावेश आहे म्हणून तुडतुड्याचे नियंत्रण, व्यवस्थापन करताना इतर किडीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वातावरणामध्ये होणाऱ्या बदलामुळे आंब्यामध्ये पुन्हा मोहोर येण्याचे प्रमाण वाढले आहे. आंब्याला नियमित व लवकर मोहोर येण्यासाठी पॅक्लोब्युट्रॉझॉल (कल्टार) वापरही अवाजवी झाल्यास मोहोर अखुड व झुबकेदार येत असल्यामुळे कीटकनाशकाची फवारणी मोहोराच्या आतील भागात पोहोचू शकत नाही. जुन्या आंबा बागामुळे झाडाची उंची १० मीटरपर्यंत उंच असल्याने फवारणी यंत्राचा उपयोग करणे शक्य नसते. सदोष फवारणी बरेच आंबा बागायतदार झाडावर चढून फवारा शेंड्यापर्यंत पोहोचावा म्हणून पिचकारी पद्धतीचा अवलंब करतात. त्यामुळे फवारणीची कीटकनाशके मोहोरावर व पानावर चिकटून न राहता खाली पडतात. झाडाच्या आतील फांद्याची विरळणी करावी, जेणेकरून सूर्यप्रकाश आतमध्ये पोहोचेल व हवा खेळती राहील. तसेच कीटक, कीडनाशकांची फवारणी संपूर्ण झाडावर करता येतील. खताचा संतुलित वापर करावा. ज्या ठिकाणी मिजमाशीचा प्रादुर्भाव जास्त आहे, अशा ठिकाणी झाडाखालची जमीन नांगरावी, झाडाखाली काळ प्लास्टिक टाकावे. मिजमाशी अळ्या कोषावस्थेत जाण्यास अडथळा येऊन प्रादुर्भाव कमी होईल. कीटकनाशकाच्या वेळापत्रकानुसार फवारण्या कराव्यात, त्यामुळे तुडतुड्यामध्ये कीटकनाशकास प्रतिकारक्षमता वाढणार नाही. परंतु, तुडतुड्याशिवाय इतर कीडीही आंबा मोहोरावर आढळून येतो. तेव्हा किडींची पाहणी करून फवारणी वेळापत्रकात बदल करणे आवश्यक आहे. कीडनाशकाची फवारणी करताना ती मोजून घेऊन तुषार पद्धतीने सर्व ठिकाणी पोहोचेल अशा पद्धतीने करावी. बागेत तुडतुडा आहे/नाही, यासाठी मोहोराची नियमित निरीक्षणे घ्यावीत व प्रादुर्भाव आढळून येताच फवारणी करावी. पावसाळा संपल्यानंतर मोहोर येण्यापूर्वी १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी संपूर्ण झाडावर व्यवस्थित करावी. सिंथेटिक पायथ्राईड व इमिडाक्लोप्रिड ही फवारणीसाठी एकदाच वापरावीत. दोन कीटकनाशके एकत्र मिसळून फवारू नका. तसेच कमी तीव्रतेची किंवा अधिक तीव्रतेची औषधे फवारु नयेत. शिफारस न केलेली औषधे व इतर रासायनिक पदार्थ द्रावणात मिसळू नका.- दादा गरंडे कृषी सहाय्यक, कालुस्ते, चिपळूण