रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील एकूण ९ आगारांतून जिल्ह्यातील २०३ ठिकाणी रात्रवस्तीच्या गाड्या सोडण्यात येत आहेत. यापैकी केवळ ९९ गावांमध्ये रात्रवस्तीची सुविधा उपलब्ध असली तरी अद्याप १०४ गावांमधून ही सुविधा झालेली उपलब्ध नाही. त्यामुळे रात्र वस्तीची गाडी घेऊन जाणाऱ्या चालक - वाहकांचे हाल होत आहेत.राज्य शासनाकडून निर्मल ग्राम, हगणदारीमुक्त गावासारख्या विविध योजना राबविल्या जात असताना काही गावांमध्ये अद्याप सार्वजनिक शौचालये उपलब्ध नाहीत. ग्रामीण जनतेसाठी जीवनवाहिनी ठरलेली एस. टी. वाडीवस्तीवर जाऊन पोहोचली आहे. मात्र, रात्रवस्तीला जाणाऱ्या वाहक - चालकांना गाडीतच झोपावे लागते. शिवाय शौचालय सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. वाडीवस्तीवर गाडी घेऊन जाणाऱ्या वाहक - चालकांना जेमतेम पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होते. अन्यथा वाहक - चालकांना पाण्याच्या बाटल्या सोबतच ठेवाव्या लागत आहेत. रात्री - अपरात्री वाहक - चालकाना शौचासाठी बाहेर उघड्यावर बसणे धोकादायक बनले आहे. अशावेळी एखादे विषारी सरपटणारे जनावर चावले तर संबंधित वाहक - चालकांची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न वाहक - चालकांमधून व्यक्त केला जात आहे. जनतेच्या सोयीसाठी गाडी घेऊन जाणाऱ्या वाहक - चालकांसाठी संबंधित ग्रामपंचायतीकडून शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.महामंडळाकडून जिल्हा परिषद, पंचायत समितीकडे पत्र व्यवहार करुनसुद्धा अद्याप सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे एस. टी. कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. शासकीय विविध योजनांची अंमलबजावणी करुन पुरस्कार मिळवू पाहणाऱ्या गावांनी याची दखल तातडीने घेणे गरजेचे आहे.गाव हगणदारीमुक्त करत असतानाच सार्वजनिक शौचालय उभारुन वाहक - चालकांसाठी सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. महामंडळातील विविध कर्मचारी संघटनेतर्फे याबाबत वेळोवेळी आवाज उठविला जातो. आंदोलने, निदर्शने केली जातात. मात्र, त्याकडे अद्याप दुर्लक्ष केले जात असल्याचे जाणवते.पावसाळ्यात ग्रामीण भागात शौचालयाची सुविधा उपलब्ध न झाल्यास रात्रवस्तीच्या गाड्या घेऊन न जाण्याचा इशारा वाहन चालकांकडून देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)आगाररात्रवस्तीचीसुविधा ठिकाणेअसलेलीनसलेली गावेगावेदापोली११८३खेड२७१८९चिपळूण२९२२७गुहागर१७१४३देवरुख२५४२१रत्नागिरी४५३०१५लांजा१५६९राजापूर२३८१५मंडणगड११९२एकूण२०३९९१०४
१०४ गावांमध्ये शौचालय सुविधा नाही
By admin | Updated: July 2, 2015 22:49 IST