शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

महामार्ग रुंदीकरणाला विरोध

By admin | Updated: June 22, 2017 01:05 IST

कुडाळ येथील आमसभेत झारापच्या ग्रामस्थांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क कुडाळ : आमसभेत जनतेच्या आलेल्या प्रश्नांबाबत महिनाभरात आढावा बैठक आयोजित करून हे प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कुडाळ तालुक्याच्या आमसभेत बोलताना आमदार वैभव नाईक यांनी दिली. या सभेत महामार्गावर पडलेले खड्डे मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे बुजविण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून भाजपाचे पदाधिकारी व काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याने वातावरण काही काळ तंग होते. मात्र, ही आमसभा खेळीमेळीत पार पडली. महामार्गाचे खड्डे रात्रीच्यावेळी बुजविले जात आहेत. मंत्र्यांसाठी खड्डे बुजवू नका. त्यांना खड्ड्यांतूनच येऊ द्या. गेल्यावर्षी कोणत्या एजन्सीने खड्डे भरले त्याची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी केली. यावेळी भाजपाचे राजू राऊळ बोलत असताना वादंग झाला. जुने काय झाले ते नको, आताचे काय ते बोला, असे सांगत काँगे्रस कार्यकर्ते आक्रमक झाले. यामध्ये हस्तक्षेप करत एजन्सीने नीट काम न केल्यास कारवाई करण्याचे आश्वासन आमदार नाईक यांनी दिले. तर सतीश सावंत यांनी २४ जूननंतरच खड्डे भरा, असा टोला हाणला. रूपेश कानडे यांनी प्रश्न मांडतानाच झाराप रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही, तसेच चौपदरीकरणामध्ये झाराप बाजारपेठेवर अन्याय होत असेल तर तीव्र विरोध करण्याचा इशारा त्यांनी दिला. जिल्ह्यातील इतर बँका कर्ज नाकारत आहेत. बँक मॅनेजरांची अशी मानसिकता असेल, तर येथील शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायला नको, असे निदर्शनास आणून दिले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांशी बँकांची संंयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन आमदार नाईक यांनी दिले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अनेक तक्रारी आहेत. कामे पूर्ण होत नाहीत, अंदाजपत्रके मिळत नाहीत, अशा तक्रारी असल्याचे सांगत आमदार नाईक यांनी या विभागातील कामांचा आढावा घेणार असल्याचे सांगितले. निवजे पोलीस ठाण्यात येणारी कुडाळ तालुक्यातील गावे कुडाळ पोलीस ठाण्याला सोडण्याची मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी मांडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सतीश सावंत यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडताना शेवगा, पपई, अननस यांना एमआरईजीएसमधून लागवड निधी मिळावा, सोनवडे-कडावल पंचक्रोशीसाठी आरोग्यकेंद्र, वीज वितरण सेक्शन आॅफिस मिळावे. राष्ट्रीय पेयजलचा आराखडा करण्याची केंद्राची परवानगी जिल्हा परिषदेला नाही, ती मिळावी. शेती कनेक्शन मिळावे, जांभवडे-भटवाडी ते सोनवडे रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून व्हावा, यांत्रिकीकरणासाठी निधी द्यावा, विद्यापीठाने मान्यता दिलेल्या बांबू लागवडीला रोजगार हमीमधून शासनाने मान्यता द्यावी, बांबू रोपाची किं मत ९ रूपये आहे ती १२ रूपये व्हावी, असा ठराव घेतला. कुडाळचे तहसीलदार अजय घोळवे हे जरा उशिराने आले. त्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी थेट सभेतच नाराजी व्यक्त केली. सभेची पूर्वकल्पना असूनही वेळेत का आला नाहीत? हे योग्य नाही, असे आमदार नाईक यांनी सुनावले.