शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

गोगटे-जोगळेकरमध्ये प्रकल्प सादरीकरण

By admin | Updated: December 1, 2014 00:17 IST

तीन गटांमध्ये व पदव्युत्तर स्तरावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ११६ प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले

रत्नागिरी : येथील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात ‘आविष्कार’ या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेच्या जिल्हास्तरीय निवड फेरीचे आयोजन करण्यात आले होते. तीन गटांमध्ये व पदव्युत्तर स्तरावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ११६ प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पोस्टर व पॉवर पॉर्इंटच्या माध्यमातून आपले संशोधन परीक्षकांसमोर सादर केले.कला शाखेत घेण्यात आलेल्या स्पर्धेत पदवीस्तरातून हिमानी कोत्रे, श्रुती साळवी, चेतना घाटे (गो-जो-महाविद्यालय), डिंपल वासवानी, चित्रलेखा खानविलकर (एससीएस महाविद्यालय, लांजा), नगमा वेलिसकर (डीबीजे महाविद्यालय), निहार वैद्य, चिन्मयी कोचरे (नातू महाविद्यालय) यांची, तर पदव्युत्तर गटांतून गौरी सावंत (गो-जो महाविद्यालय), अरविंद निवदेकर (डीबीजे महाविद्यालय) यांची पुढील फेरीकरिता निवड झाली आहे.वाणिज्य शाखेमध्ये पदवीस्तरावर मुस्सरत मुल्ला, अक्षता शेवडे, अक्षय शेरे (गो - जो महाविद्यालय), अक्षयकुमार लिंबानी (डीबीजे महाविद्यालय), खलील पौत्रिक (ज्ञानदीप महाविद्यालय, खेड) विद्यार्थी यशस्वी झाले. विज्ञान शाखेतील स्पर्धेमध्ये पदवीस्तरावर कांचन ठाकूर, अनिरूध्द भिडे, श्रुती वाघधरे, दिप्तेश शितोळे, तेहसीन नाकाडे (गो - जो महाविद्यालय), रूखसार खतीब, माधुरी कारंडे (ए. एस. पी. महाविद्यालय, देवरूख), स्वाती गवस (डीबीजे महाविद्यालय), स्नेहल रसाळ, विराज पालवी, ऋषिकेश कोलते, सिध्दी लाडे (एसीएस महाविद्यालय, लांजा), योगेश देशमुख (आयसीएस महाविद्यालय, खेड), प्रतीक नाटेकर (ए. एन. महाविद्यालय, राजापूर), अन्वी वैद्य (दापोली महाविद्यालय) हे विद्यार्थी यशस्वी ठरले. पदव्युत्तर गटात प्राजक्ता शेट्ये (दापोली कॉलेज), निनाद वाणी (डीबीजे महाविद्यालय) यांची निवड करण्यात आली.स्पर्धेसाठी कला शाखेकरिता परीक्षक म्हणून डॉ. मृगेंद्र रॉय, डॉ. निधी पटवर्धन, प्रा. विजय तापस, डॉ. वैभवी पळसुले, वाणिज्य शाखेकरिता डॉ. सुनीती नागपूरकर, डॉ. वीणा प्रसाद, प्रा. मधुकर मगदूम, डॉ. सुवर्णा देवूस्कर, प्राचार्य अ‍ॅड. राजशेखर मलुष्टे, प्रा. हेलन सेल्वाज, तर विज्ञान शाखेसाठी प्रा. प्रल्हाद सोमण, प्रा. डी. डी. जोशी, प्रा. आर. पी. पाटील, प्रा. मंगेश साठे यांनी काम पाहिले. स्पर्धेची पुढील फेरी विद्यापीठ स्तरावर ३ डिसेंबर रोजी सी. के. टी. महाविद्यालय, पनवेल येथे होणार आहे. (प्रतिनिधी)