शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

मराठीचे प्राध्यापक वाचत नाहीत

By admin | Updated: November 30, 2014 00:53 IST

नागनाथ कोतापल्ले यांची खंत; संमेलनात पुस्तक प्रकाशन उत्साहात

असगोली : गुहागर येथे आज हे पहिले संमेलन असले तरी ‘पुढील काळात दरवर्षी परंपरा म्हणून अशी संमेलने व्हावीत. ग्रंथाच्या पूजेबरोबर ग्रंथाचे वाचन महत्वाचे होत राहिले तर आपला समाज अधिक उन्नत होत राहील. सर्व सुविधा घरी असतात पण पाच पुस्तक अनेकांच्या घरी असतात. याला मराठीचे प्राध्यापकही अपवाद नाहीत, अशी खंत आज ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केली.लेखन करणं हे आपल्या संस्कृतीमधील धर्म आहे. पुस्तक माणसाला चांगला विचार करायला शिकवतात. वाचनामुळे माणसाचे जीवन सौख्यमय होते. माणसाचे माणूसपण शोधणं हे सर्व संस्कृतीचे मुख्य सूत्र आहे. तुम्ही किती मोठे आहात यापेक्षा तुमचे समाजात स्थान काय हे महत्वाचे आहे. साहित्य हे माणसाच्या विवेकाला जागे करण्यासाठी निर्माण होते. आज विवेकाचा दिवा विजवायचा याची लढाई चालू आहे. दोन वर्षापूर्वी नरेंद्र दाभोळकरांचा झालेला खून याचे उदाहरण आहे. ज्या नगर जिल्ह्यात ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिले तेथे दलितांचे तुकडे करुन खून होतो, अशी खंतही डॉ. कोतापल्ले यांनी मांडली.संमेलनाच्या दुपारच्या सत्रात संमेलनाध्यक्ष अशोक बागवे यांच्यासह काही स्थानिक लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आमदार भास्कर जाधव उपस्थित होते.आजच्या विज्ञान युगात विद्यार्थी तसेच तरुणवर्ग साहित्याकडे आपला रस दाखवताना दिसत नाही. मात्र त्यातूनही इथल्या भागातील काही साहित्यिक तसेच कवींनी आजही साहित्याची ही परंपरा आपल्या पुस्तक लेखनातून व काव्यसंग्रहातून जोपासली आहे. अशाच कवींच्या पुस्तक प्रकाशनाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रा.अशोक बागवे यांच्या ‘भास अभास’ या पुस्तकाच्या प्रकाशनासोबत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.बागवे यांच्या भास अभास या पुस्तकाचे प्रकाशन अक्षया कळझुणकर हिच्या हस्ते करण्यात आले. वरवेलीतील अंध कवी रामचंद्र शिवराम पवार यांच्या ‘काळोखातला अंधार’ या हस्तलिखिताचे तर शिक्षक अनिल कांबळे यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील ‘विश्वरत्न भीमराव रामजी आंबेडकर’ या पुस्तकाचे प्रकाशन आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साहित्यिक साहेबराव ठाणगे यांनी अशोक बागवे यांच्या ‘भास-अभास’ काव्यसंग्रहाबद्दल बोलताना ‘कवी जेव्हा बोलतो तेव्हा आपण नुसतं हसायचं... कवी म्हणजे कवी असतो, कवी म्हणजे ताऱ्यांमधला रवी असतो’ ही कविता सादर केली.सोहळ्याला आमदार भास्कर जाधव यांच्यासह नगराध्यक्ष जयदेव मोरे, उपनगराध्यक्षा स्नेहा वरंडे, उपसभापती सुरेश सावंत, तहसीलदार वैशाली पाटील, पद्माकर आरेकर, अशोक बागवे, मराठवाडा युवा संमेलनाच्या कार्यवाह विजया थोरात, मसाप गुहागर शाखेचे अध्यक्ष राजेेंद्र आरेकर, श्रीराम दुर्गे, राष्ट्रपाल सावंत, मामा वैद्य व साहित्य रसिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक़्रमाचे सूत्रसंचालन संजय गमरे यांनी केले. (वार्ताहर)