राजेश कांबळे -अडरे , चिपळूण तालुक्यात कुष्ठरोगाचे प्रमाण सर्वांत कमी असल्याचे उघड झाले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र फुरुस, रामपूर, कापरे, खरवते या चार आरोग्य केंद्रांत कुष्ठरूग्णांचे प्रमाण ० आहे, तर अन्य ५ प्राथमिक आरोग्य केंद्रात १२ कुष्ठरोगी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्याच्या अनेक योजना शासन नागरिकांसाठी राबवित आहे. प्रत्येक रोगाचा परिपूर्ण अभ्यास करुन विशेष मोहीमदेखील राबविली जाते. पूर्वीच्या काळात कुष्ठरोग होणे म्हणजे मागील जन्माच्या पापाचे फळ, असा गैरसमज होता. अशा रुग्णांना बाजूला ठेवले जायचे. त्यावेळी उपचाराअभावी रुग्णांची हेळसांड होत होती. कुष्ठरोगाबाबतची भीती लोकांच्या मनातून काढून टाकण्यात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे मोलाचे योगदान ठरले आहे. त्यांनी कुष्ठरोग झालेल्या रुग्णांसाठी आश्रम काढून अशा रुग्णांची सेवा करताना समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. समाजात पसरलेले गैरसमज शासनाच्या आरोग्य विभागाने केलेल्या जनजागृतीमुळे कमी झाले आहे. चिपळूण तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अहवालानुसार मार्च २०१३ ते एप्रिल २०१४ या वर्षात कुष्ठरोगाचे फक्त १२ रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे. कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम अंतर्गत कुष्ठरोगी रुग्णांवर उपचार केले जातात. पी. बी. व एम. बी. या उपचार पद्धतीचा वापर करुन कुष्ठरोगी रुग्ण बरे होतात. चिपळूण तालुक्यातील शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत संसर्गिक २ व असंसर्गिक १, उपचाराखाली ३ रुग्ण आहेत. अडरे संसर्गिक २ उपचाराखाली आहेत. सावर्डे संसर्गिक २, असंसर्गिक २ उपचार सुरु आहेत. वहाळ संसर्गिक १ उपचाराखाली आहे. दादर संसर्गिक ३ रुग्णांवर उपचार चालू आहेत. असंसर्गिक २ बरे झाले आहेत. कुष्ठरोगी असणाऱ्या रुग्णांवर १२ महिने औषधोपचार व असंसर्गिक रुग्णांवर ६ महिने औषधोपचार करुन बरे केले जातात.चिपळूण तालुक्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अहवालानुसार मार्च २०१३ ते एप्रिल २०१४ या वर्षात कुष्ठरोगाचे फक्त १२ रूग्ण असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, यावर्षी अशा प्रकारचे रूग्ण आढळले नसल्याचे सांगण्यात आले. यावर्षी अशा रूग्णांना त्वरित उपाय करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. -- प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत एकही कुष्ठरोगाची नोंद नाही -- पूर्व विभागात संसर्गितांची संख्या अधिक, वैद्यकीय उपचार सुरु.-- सहा महिन्यात उपचार केल्यावर रुग्ण होतो बरा.-- पी. बी. व एम. बी. पध्दतीने रुग्ण बरा होतो.-- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्याच्या योजना राबविण्यात येत असतात.कुष्टरोग बरा होत नाही, याबाबत आपल्याकडे अनेक गोष्टी सांगितल्या जातात. काहींच्या मते हा रोग कधीही बरा होणारा नाही. पण, वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती झाली असल्याने आता पी. बी. व एम. बी. पध्दतीने रुग्ण बरा होतो. याची जनजागृती होणे गरजेचे आहे.४चिपळूण तालुक्यातील शिरगांव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत संसर्गिक २ व असंसर्गिक १ उपचाराखाली ३ रूग्ण आहेत. अडरे,सावर्डे, वहाळ, दादर केंद्रातही काही रूग्णांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सहा महिन्यात हे रूग्ण बरे होतात व त्यानंतर त्यांना नवजीवन मिळते असा प्रयत्न हा केवळ मानसिक उर्मीतूनच करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
कुष्ठरूग्णांचे प्रमाण कमी-चिपळूण तालुका
By admin | Updated: July 24, 2014 23:12 IST