शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

‘जलशिवार’ने तहान भागणार

By admin | Updated: November 11, 2015 23:47 IST

रत्नागिरी जिल्हा : ३९१ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली...!

रत्नागिरी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गतवर्षीपासून जलयुक्त शिवार योजना राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात तालुक्याला पाचप्रमाणे जिल्ह्यातील एकूण ४७ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आली. त्यामुळे जिल्ह्याच्या पाणीसाठ्यात १५४०.५ दशलक्ष घनमीटर इतकी वाढ झाली आहे. संरक्षित सिंचनामुळे ५८६.६१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार असून, ३९१ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार आहे. यावर्षी निम्मा पाऊस झाल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाईचा धोका आहे. कोकणातील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे पाणी जमिनीवाटे नदी, नाले, समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे पाणी अडवण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. सध्या शासनाकडून लोकसहभागातून बंधारे उभारण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेकडून बंधारे उभारण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. वनराई बंधारे, कच्चे बंधारे आणि विजय बंधारे उभारण्याचे काम सुरू आहे. ग्रामसेवक, कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक संस्था बंधारे उभारण्याच्या कामात सहभाग होत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २०७० बंधारे उभारण्यात आले आहेत. लोकसहभागातून भविष्यात १० हजार बंधारे उभारण्याचे काम पूर्ण करून करोडो लीटर पाण्याची बचत करण्याचे उद्दिष्ट निश्चत करण्यात आले आहे.जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात ५६४.९९ हेक्टर क्षेत्रावर समतल चर मारल्यामुळे ४८५.५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. १६ हेक्टर क्षेत्रावर मजगी बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे १५४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. ४३.१२ दशलक्ष घनमीटर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आहे. ३० शेततळी उभारण्यात आली आहेत. एका शेततळ्यात २.९६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होतो. त्यामुळे शेततळ्यांव्दारे १३१.७६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. ३९.९६ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार आहे.जिल्ह्यात ३५ नालाबांध बांधण्यात आले आहेत. त्यामुळे ५६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. १३०.६० हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार आहे. २० माती नाला बांध बांधण्यात आले असून, २४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. ७६.४ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार आहे. जिल्ह्यात १५४०.५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला असून, पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. ३९१ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार असल्यामुळे दुबार पीक घेणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)श्रमदानातून बंधारे : ग्रामस्थांचा सहभाग1राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना जाहीर केल्यानंतर त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही ग्रामस्थ श्रमदानाने बंधारे बांधून पाणी अडवण्याच्या कामी पुढे येताना दिसत आहेत.2दापोली, गुहागर या तालुक्यात या बंधाऱ्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून, त्याठिकाणी पाण्याची पातळी वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे या कृतीतून इतर गावांनाही प्रेरणा मिळू लागली आहे.3यंदा पाऊस कमी झाल्याने भविष्यात पाणीटंचाई जाणवणार हे निश्चित आहे. प्रतिवर्षी पाणीटंचाईवर करोडो रुपयांचा खर्च होतो. यावर्षी तर तो आणखीन वाढण्याची शक्यता आहे.