शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एकरूपता जपणारा उत्सव

By admin | Updated: September 5, 2014 00:17 IST

गणेशोत्सवाचा आनंद तोच : विविध प्रांतातील चालीरिती वेगळ्या

प्रसन्न राणे -सावंतवाडी -समाजाला एकत्र आणण्याकरिता गणपतीच्या उत्सवाला बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक स्वरुप दिले. या उत्सवाला समाजाचाही इतका मोठा प्रतिसाद लाभला आहे की, कोकणाप्रमाणे राज्याच्या अन्य ठिकाणीही गणेशोत्सव साजरा केला जात आहे. प्रत्येक प्रांताच्या विविध प्रथांमध्ये व नैवेद्यांच्या प्रकारांमध्ये वैविध्यता असली तरीही गणेश उत्सवाचा आनंद हा सर्वांनाच प्रेरणा देणारा ठरत आहे.गणेशाचा नैवेद्य म्हणजे कोकणात उकडीचे मोदक, करंज्या, पंचखाद्य, तांदळाची खीर वगैरे गणेश चतुर्थीत केले जातात. परंतु बहुभाविक संस्कृती असलेल्या भारतातील बहुसंख्य प्रांतात गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. वेंगुर्लेतील मूळचे व कामानिमित्त दिल्ली, बिहार, कोलकत्ता, बेंगलोर, केरळ, तसेच परदेशातही असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव इतर राज्यात कशा पध्दतीने साजरा केला जातो आणि बाप्पाच्या नैवेद्याला कोणते पदार्थ बनविले जातात, याबाबत प्रांतानुसार वेगवेगळी प्रचिती येते. कोकणात गणपती हा कुटुंबवत्सल मानला जातो. त्यामुळे रिध्दी- सिध्दीही सोबत असतात. परंतु केरळ प्रांतात गणपती हा ब्रम्हचारी, तर कार्तिकस्वामी हा कुटुंबवत्सल देव मानला जातो. खरे तर, केरळचा नववर्ष दिन (ओणम) हा महत्त्वाचा सण आहे. त्यांच्याकडे अधिक महिना वगैरे पद्धत नाही. नववर्षाच्या चौथ्या दिवशी गणपती आणून त्याचे पाच दिवसांसाठी पूजन केले जाते. त्याला पायसम् हा नैवेद्य दाखविला जातो. आपल्याकडे ऋषिपंचमीला निरनिराळ्या भाज्या घालून जी भाजी केली जाते, तशीच वेगवेगळ्या भाज्या अवियल ही एक भाजी केली जाते. तर पायसम हा खिरीचाच एक प्रकार आहे. कलकत्ता, चेन्नई, दिल्ली, लंडन अशा विविध ठिकाणी गणपतीचे घरोघरी पूजन होत नाही. परंतु या भागात स्थायिक झालेले महाराष्ट्रीय लोक महाराष्ट्र मंडळात अगदी जल्लोषात एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोत्सवाचा आनंद लुटतात. पारंपरिक फुगड्या, आरत्या, नाटक, संगीत अशाने सांस्कृतिक स्वरूप या उत्सवाला आलेले असते. त्यातही शक्य असल्यास व गणपतीची मूर्ती उपलब्ध झाल्यास अगदी शनिवार-रविवार अशा सुट्टीच्या दिवशीही हौशी लोक गणपतीचे घरीच पूजन करायला प्राधान्य देतात. उत्तर प्रदेशात गणेशोत्सव साजरा केला जात नाही. परंतु आपल्याकडील मोदकाला तेथील लोक ‘मिठे मोमो’ असे म्हणतात. विविध प्रांतातील रेसीपिज व प्रामुख्याने गणेशोत्सवात भारतातील विविध प्रांतांमध्ये साजरा होणारा गणेशोत्सव व गणेशाला दाखविले जाणारे प्रांतवार नैवेद्य यात जरी वेगळेपणा असला तरीही यातून जनसामान्यांना मिळणारा आनंद मात्र, तोच आहे. सर्वांमधील एकी जपून त्यांना सन्मार्ग दाखविणाराच सण सर्वांत मोठा मानला जातो. आणि गणेशाचा हा उत्सवही विविध प्रांतातील एकता टिकविणारा बनलेला आहे. कोकणातील पद्धत लोकप्रियमहाराष्ट्रात केरळवासीय नोकरीनिमित्त आले आहेत, त्यांना कोकणातील पद्धत जास्त आवडल्याने ते महाराष्ट्रीयन पद्धतीनेच गणपतीचे पूजन करू लागले आहेत व पारंपरिक रेसीपिज करू लागल्याचे दिसून येत आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक येथे महाराष्ट्राप्रमाणेच मूर्ती आणून पाच व दहा दिवस असे पूजन केले जाते. मोदकाऐवजी डाळीचे सारण असलेले कडबू जे तांदळाची उकड काढून किं वा कणिकाचे तळून अशा पद्धतीने केले जातात व हा नैवेद्य दाखविला जातो. म्हैसूर बेंगलोरमध्ये खास मूर्ती आणतात. पण मेंगलोरमध्ये घरच्याच गणपतीचे पूजन केले जाते. येथे हरितालिकेप्रमाणेच गौरीचेही पूजन होते. परंतु उपवास केला जात नाही. याठिकाणी मात्र बाप्पाला इडली-सांबार आणि चटणी असा नैवेद्य असतो. परंतु नैवेद्यातील इडली नेहमीपेक्षा वेगळी असते. म्हणजे इडली पिठाचीच, परंतु गोल आकारात नसून एका विशिष्ट आकाराच्या पानाचा द्रोण करून त्यात ते पीठ ओतले जाते किं वा अगदीच ते पान नाही मिळाले, तर उभट ग्लासमध्ये हे सारण ओतून इडली तयार केली जाते. या नैवेद्याला ते कडबू असे म्हणतात.