वैभव साळकर- दोडामार्ग तालुक्यासहीत संपूर्ण सिंधुुदुर्ग जिल्ह्यात गेल्या बारा वर्षांपासून दहशत माजविणाऱ्या जंगली हत्तींसाठी तिलारीच्या जंगल परिसरात ‘एलिफंट कॉरिडॉर’चा प्रस्ताव वनविभागाने तयार केला आहे. या प्रस्तावास वरिष्ठ पातळीवरून हिरवा कंदीलदेखील मिळाला आहे. परंतु या एलिफंट कॉरिडॉरला दोडामार्ग तालुक्यातून प्रखर विरोध होण्याची शक्यता आहे. एकंदरीत या एलिफंट कॉरिडॉरच्या प्रस्तावावर विरोधाची टांगती तलवार असल्याने वनविभागाची मात्र हत्तीप्रश्न सोडविताना चांगलीच कसोटी लागणार आहे. सन २००२ पूर्वी म्हणजेच आजपासून तब्बल १२ वर्षांपूर्वी दोडामार्ग तालुक्याला जंगली हत्ती हा प्राणी पुस्तकातून व सर्कशीच्या माध्यमातूनच माहित होता. केवळ सर्कस आणि कधीतरी अपवादाने येणारा प्रशिक्षित हत्ती एवढीच ओळख येथील लोकांना हत्तीविषयी होती. परंतु, त्याच्या दहशतीमुळे होणारा थरकाप माहित नव्हता. मात्र, २००२ पासून ही ओळख एवढी निर्माण झाली की, त्यानंतर हत्ती म्हटल्यावर येथील श्ोतकऱ्यांंच्या उरात धडकीच भरू लागली. गेल्या बारा वर्षात दोडामार्ग तालुक्याने हत्तींचा उपद्रव जसा झेलला, त्या तुलनेत इतर ठिकाणी हत्तींचा उपद्रव तसा कमीच आहे. मात्र, आता हत्तींना पकडून, त्यांना प्रशिक्षित करून तिलारीच्या जंगलात सोडण्याचा मानस वन विभागाचा आहे. तसा प्रस्तावदेखील तयार करण्यात आला असून त्याला वरिष्ठ पातळीवरून मंजुरीदेखील मिळाली आहे. मात्र, एलिफंट कॉरिडॉरला स्थानिक जनतेतून विरोध होण्याची शक्यता आहे. येथील लोकांचे मतपरिवर्तन करण्याचे मोठे आव्हान वन विभागासमोर उभे ठाकणार आहे. मध्यंतरीच्या काळात तिलारी जंगली हत्तींसाठी अभयारण्य बनविण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. मात्र, त्यावेळी स्थानिक जनता आणि लोकप्रतिनिधींनी त्यास विरोध दर्शविला. दोडामार्ग पंचायत समितीच्या मासिक बैठकीतही हत्तींसाठी अभयारण्य होऊ नये, असा ठराव तत्कालीन पंचायत समिती सदस्य आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी त्यावेळी मांडला होता. या साऱ्या पार्श्वभूमीचा विचार करता तिलारीत ‘एलिफंट कॉरिडॉर’ बनविण्यास तालुकावासीयांचा विरोध होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास हत्तीप्रश्न सोडविताना वनविभागाची मात्र चांगलीच दमछाक होणार आहे. विरोधाची भूमिकातिलारीच्या जंगलात एलिफंट कॉरिडॉर करण्यास दोडामार्ग तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला आहे. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी हत्तींना तिलारीत आणून सोडण्यास आपला विरोध असून तसे झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला आहे. तर जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांनी हत्तींना तिलारीत आणून सोडण्याऐवजी त्यांना कर्नाटकात सोडावे, अशी मागणी केली आहे. ज्या यातना आज जिल्हावासीय भोगत आहेत, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त त्रास तालुकावासीयांनी सोसले आहेत. त्यामुळे तिलारीत हत्तींना सोडू नये, असे ते म्हणाले. तसेच खासदार विनायक राऊत यांनी आॅगस्टमध्ये हत्तींना पकडून कर्नाटकमध्ये सोडले जाईल, अशी घोषणा केली होती, त्याचे काय झाले, असा सवालही उपस्थित केला. १४ पालिकांची मुदत संपलेलीहळूहळू हत्तींचा कळप दोडामार्ग तालुक्यातून पुढे पुढे सरकू लागला. नजीकच्या गोवा राज्यातही या हत्तींनी आपला प्रताप दाखविला. त्यामुळे गोव्याच्या आणि सिंधुदुर्गचा वनविभाग यांच्यात हत्तींना हद्दीत हाकलण्यावरून चढाओढ निर्माण झाली.शेवटी हा कळप सावंतवाडी, कुडाळच्या दिशेने गेला. कुडाळमधून मालवण, कणकवली आणि वैभववाडी असा प्रवासही त्यांनी करत जिल्हा पादाक्रांत केला.हत्तींच्या उपद्रवाने शेतकरी हैराणमांगेली येथे सर्वप्रथम या हत्तींचे आगमन झाले. कर्नाटकातून हे हत्ती सिंधुदुर्गात दाखल झाले.दांडेली अभयारण्यातून या हत्तींनी आपला मोर्चा मांगेलीत वळविला होता.कर्नाटक राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे ते येथे आले. सुरुवातीला येथील लोकांनी गजांतलक्ष्मी आपल्या गावात आल्याच्या आनंदात हत्तींच्या पावलांची पूजा केली. त्यावेळी ते लोकांना नवल वाटत होते.परंतु त्यानंतर मात्र, याच हत्तींमुळे मांगेलीतील शेतकऱ्यांना कायमची भातशेती सोडावी लागली.आजही तालुक्यातील मांगेलीमध्ये हत्तींच्या भीतीने भातशेती केली जात नाही. त्यानंतर या हत्तींनी मांगेलीमधून खाली प्रवेश केला. तिलारी धरणातील विपुल जलसाठा होता. केळी, पोफळी व नारळाच्या बागांमुळे हत्ती स्थिरावले.तिलारी खोऱ्यातील मुळस, हेवाळे, बाबरवाडी, कोनाळकट्टा, विजघर, पाळये आदी गावात हत्तींमुळे प्रचंड दहशत निर्माण झाली. हा सिलसिला दरदिवशी सुरूच होता.अपार कष्ट करून शेतकऱ्यांनी फुलविलेल्या बागा हत्तींचा कळप एका रात्रीत उद्ध्वस्त करायचा.
‘एलिफंट कॉरीडॉर’वर टांगती तलवार
By admin | Updated: December 2, 2014 00:22 IST