शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

जिल्हा प्रशासन सापडले गोत्यात

By admin | Updated: July 18, 2014 23:15 IST

कोटीच्या घरात वसुली : पंचायत राज समितीच्या दौऱ्याची पार्श्वभूमी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंचायत राज समिती येण्याच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाने करोडो रूपयांची वसुली केली असून यापूर्वी दोनवेळा जमा केलेल्या निधीचे काय झाले? असा प्रश्न कर्मचाऱ्यांतून उपस्थित होत आहे. दोनवेळा दौरा रद्द झाल्यानंतर आता ही समिती जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर उपस्थित झालेल्या या प्रश्नामुळे जिल्हापरिषद प्रशासन पुरतेच गोत्यात आले आहे. दरम्यान, सर्व शिक्षक संघटनांनी या वर्गणी वसुलीला विरोध करीत आवाज उठविल्यानंतर आता इतर कर्मचाऱ्यांनीही तोंड उघडण्यास सुरूवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या तपासणीसाठी विधानपरिषद आमदारांची पंचायत राज समिती गेल्या दीड वर्षापासून जिल्हा दौऱ्यावर येणार असे दौरे निश्चित होत होते. यापूर्वी मार्च २०१३ व त्यानंतर फेब्रुवारी २०१४ असे दोनवेळा ही समिती येणार अशा सूचना आल्या. या सूचनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद विभाग, कर्मचाऱ्यांकडून वर्गणी घेण्यास सुरूवात केली आणि या दोन्हीही वेळी तशी वर्गणी वसुलही केली. मात्र या दोन्हीवेळी समिती आली नाही. आता तिसऱ्यावेळी म्हणजे १७ जुलैपासून ही समिती सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आली असून या पार्श्वभूमीवर तिसऱ्यांदा पुन्हा वर्गणी जमा करण्यात आली. अशी बसवली गेली वर्गणी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागवार वर्गणी बसविण्यात आली असून ही वर्गणी कर्मचारी पदांप्रमाणे कमी-जास्त असते. जिल्हा परिषद व पंचायत समिती मिळून एकूण १५०० कर्मचारी असून २ हजार ते ५ हजार अशी प्रत्येकी वर्गणी बसवली जाते. त्यामुळे हा आकडा सरासरी प्रत्येकी कर्मचारी ३ हजार धरल्यास सुमारे ४५ लाखांवर पोहोचत आहे. त्याचप्रमाणे प्रती प्राथमिक आरोग्य केंद्र ५ हजार याप्रमाणे ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे मिळून १ लाख ९० हजार रुपये, पशुवैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय ५० हजार तर तालुका कार्यालयाकडून प्रत्येकी २५ हजार मिळून २ लाख ५० हजार रुपये, प्रती ग्रामसेवक २ हजार याप्रमाणे सुमारे ७ लाख, सार्वजनिक बांधकाम विभाग २ लाख, तसेच इतरही काही महत्त्वाच्या कार्यालयांकडून ही वर्गणी वसूल केली गेली आहे. यात जिल्हा परिषद परिचर व चालकांना वगळण्यात आले असल्याचेही बोलले जात आहे. पहिल्या दोन वेळची वर्गणी गेली कुठे? यापूर्वी दोन वेळा असाच सुमारे ६० लाख रुपये निधी घेतला. असा आतापर्यंत सुमारे १ कोटी ६० लाख रुपये प्राप्त झाल्याचे बोलले जात असून यापूर्वी दोनवेळा गोळा केलेल्या पैशांचे काय झाले? ते कोठे खर्ची केले? त्याची स्थिती काय? असे एक ना अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, यावेळी या निधीबाबत शिक्षक संघटनांनी नकार देत या प्रकरणाला वाचा फोडली असल्याने आता इतर कर्मचारीही याबाबत उघड उघड बोलू लागले आहेत. मात्र, ऐन पीआरसीच्या दौऱ्यातच हे प्रकरण बाहेर आल्याने पैसे वसूल करणाऱ्यांची मात्र बोबडी वळली आहे. (प्रतिनिधी)