शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मालकीबाबत कुळांमध्येच उदासीनता

By admin | Updated: November 11, 2015 00:15 IST

दोन जिल्ह्यात अधिनियम लागू : मालकी हक्क प्रस्थापित करण्यात चिपळूण अग्रक्रमाकांवर

रत्नागिरी : कुळांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळावा, यासाठी शासनाने अगदी अल्पशी नजराणाची रक्कम भरून त्यांना मालक होण्याची संधी दिली असली तरी याबाबत कुळांमध्येच कमालीची उदासीनता दिसत आहे. याबाबत अनेक उपक्रम राबवूनही आतापर्यंत ५८ टक्के खातेदारांनीच नजराणाची रक्कम भरून मालकी प्रस्थापित केली आहे. मात्र, सर्वाधिक मालकी हक्क प्रस्थापित करण्यात चिपळूण तालुका अग्रक्रमांकावर आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ लागू करण्यात आला आहे. आता कूळ हक्काने मिळालेल्या जमिनीची विक्री करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची गरज नाही, अशी सुधारणा या कायद्यात करण्यात आली आहे. त्यानुसार आता कुळांनी खरेदी केलेल्या जमिनीची खरेदी - विक्री, देणगी, अदलाबदल, गहाण ठेवणे, भाडेपट्ट्याने देणे, अभिहस्तांतरण यासाठी कोणत्याही पूर्वमंजुरीची आवश्यकता राहणार नाही. मात्र, त्यासाठी ४० पट नजराणा भरून मालकी हक्क प्रस्तापित करणे गरजेचे आहे. या जमिनी मालकांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी त्या जमिनीच्या आकाराच्या ४० पट नजराणा भरून सातबारावर रितसर नोंद करून घेणे अनिवार्य आहे. नजराण्याची रक्कम ही अतिशय अल्प म्हणजे अगदी पाच रुपयांपासून पुढे अशी आहे. मात्र, याबाबत कुळांमध्येच उदासीनता दिसून येत आहे. मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने कुळांची मालकी प्रस्तापित होऊन त्यांचे नाव सातबारावर नोंदवण्यासाठी विशेष मोहीम राबविली होती. मात्र, त्यालाही कुळांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात एक लाख ८० हजार ७९१ खातेदार आणि २ लाख ३९ हजार १०९ पोटहिस्से आहेत. मात्र, आत्तापर्यंत ९१,५३४ खातेदारांनी १ लाख ३८ हजार ६४० पोटहिस्से यांची नजराणा रक्कम भरून जमीनीवर मालकी हक्क प्रस्थापित केला आहे. अजूनही ८९ हजार २५७ खातेदारांची नजराणा रक्कम भरावयाची आहे. कुळांना मालकी हक्क प्रस्थापित करून देण्याचे सर्वाधिक काम चिपळूण तालुक्यात झाले आहे. त्याखालोखाल गुहागर, रत्नागिरी आणि लांजाचा क्रमांक लागतो. संगमेश्वरमध्ये निम्म्यापेक्षा जास्त कुळांनी या हक्काचा लाभ घेतला आहे. मात्र, मंडणगड राजापूर आणि दापोली तालुक्यांमध्ये अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला आहे. (प्रतिनिधी)सध्या या जमिनी नियंत्रण सत्ता प्रकार (निसप्र) पद्धतीने शासनाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे त्यावर इतर कुणीही हक्क प्रस्थापित करू शकत नाहीत. यापैकी काही सहहिस्सेदार बाहेरगावी राहतात. त्यामुळे मालकी हक्काबाबत कुळे फारसा गंभीरपणे विचार करताना दिसत नाहीत. जेव्हा जमीन विकायची असेल, तेव्हा बघू, असे म्हणत आहेत.तालुकाखातेदारनजराणा भरलेले शिल्लकमंडणगड२२,०८९३५४२१,७३५ दापोली२८,८१३३,९७२२४,८४१खेड१७,३३२१३,०४७४,७८५ चिपळूण२१,३८४२१,०३०३५४संगमेश्वर२३,६३५१२,५१७११,११८गुहागर १२,७१५११,२५५१,४६०रत्नागिरी ३१३९४२१,५२९९,८६५राजापूर१४,५०९२,६५४११,८५५लांजा ८,४२०५,१७६३,२४४एकूण१,८०,७९१९१,५३४८९,२५७आतापर्यंत ५८ टक्के खातेदारांनीच नजराणाची रक्कम भरून मालकी हक्क केला प्रस्थापित.कूळ हक्काने मिळालेल्या जमिनीच्या विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची गरज नाही.नजराणाची रक्कम अतिशय अल्प आहे.