शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
5
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
6
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
7
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
8
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक अवस्था बिघडली, रस्त्यावर भयानक अवस्थेत सापडली
9
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
10
दुर्मिळ आजारामुळे १२ किलोंनी वाढला तरुणीच्या स्तनांचा आकार, असह्य वेदना होणारा भयंकर आजार
11
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
12
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
13
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
14
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
15
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
16
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
17
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
18
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
19
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
20
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?

भाषा विषयासाठी आता कृ तीपत्रिका

By admin | Updated: July 2, 2015 00:30 IST

कृष्णकुमार पाटील : गुणवत्तावाढीसाठी शिक्षण मंडळाचा निर्णय

आनंद त्रिपाठी - वाटुळ -शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व विकास करण्याच्या दृष्टीने इंग्रजी भाषा विषयाप्रमाणेच मराठी, हिंदी, संस्कृत या भाषा विषयांना कृ तीपत्रिकेप्रमाणे मूल्यमापन योजना लागू करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे.भाषा विषय म्हटले की, आठ ते दहा ओळीत उत्तरे लिहा, कारणे सांगा, संदर्भासह स्पष्टीकरण अशा प्रश्नांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत असे. परंतु या शैक्षणिक वर्षापासून एकही प्रश्नचिन्ह नसलेली कृतिपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहे. यामध्ये आकलन कृती, व्याकरणाधारित कृती, अभिव्यक्ती अशा प्रकारच्या कृ ती असणार आहेत.इयत्ता नववीची प्रचलीत भाषा विषयांची पाठ्यपुस्तके बदलणार नाहीत. त्या पाठ्यपुस्तकातील घटक, स्वाध्याय व उपक्रम यावर आधारित कृतिपत्रिका स्वरुपात मूल्यमापन असणार आहे. त्यासाठी पूरक साहित्य म्हणून कृती पुस्तिका नमुना कृती पत्रिका व नमुना उत्तरपत्रिका लवकर तयार होणार आहेत. याबाबत संबंधित विषयांच्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. याप्रकारे ८० गुणांची लेखी परीक्षा असून, २० गुणांच्या तोंडी परीक्षेमध्ये कोणताही बदल असणार नाही. मूल्यमापन योजना काटेकोरपणे अंमलात आणण्याची सर्व जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील, असे पाटील यांनी सांगितले आहे.अभ्यास मंडळाने केलेला बदल स्तुत्य आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना वाचन व आकलन करावे लागणार आहे. पाठांतर करुन उत्तरे लिहिण्याच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांची वाचन क्षमता कमी झाली होती. आता संपूर्ण पाठ समजून घेतल्याशिवाय तो कृ ती सांगूच शकणार नाही. निश्चितच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत मिळणार आहे.- कल्पना तुमलाम,मराठी शिक्षिका, आदर्श विद्यामंदिर, वाटूळ