शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

पाऊले चालती आंगणेवाडीची वाट

By admin | Updated: February 23, 2016 23:51 IST

भराडी देवी यात्रोत्सव एका दिवसावर : दुकाने सजली, लगबग वाढली, वीज कंपनीबाबत नाराजी

बागायत : अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीतील भराडी देवी यात्रेची आता मोठ्या प्रमाणात लगबग दिसून येत आहे. आंगणेवाडीच्या रस्त्यांच्या दुतर्फा दुकाने उभारून दुकानदार आपापली दुकाने सजवताना तर राजकीय मंडळी आपापल्या पक्षाच्या कार्यालयाची सजावट करताना दिसत आहेत. यात्रोत्सव २५ फेब्रुवारीला होत असल्याने सोमवारपासूनच आंगणेवाडीच्या दिशेने दररोज शेकडो गाड्या मार्गस्थ होत आहेत. मंदिर परिसरात मंडपाचे तसेच विद्युत रोषणाईचे काम पूर्णत्वास येताना दिसत आहे. वीज वितरणचे कर्मचारी ठिकठिकाणी जोडणी करताना दिसत आहेत. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. आरोग्य विभाग पिण्याच्या पाण्याच्या चाचण्या घेत असून पाणी शुद्धीकरणासाठी सर्वत्र फिरत आहेत. महसूल विभाग आपली योग्य कामगिरी बजावत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग अजूनही रस्ते सजविणे, खड्डे भरणे यावर भरत देताना दिसत आहेत. बीएसएनएल आपली अखंड सेवा देण्यासाठी काम करत आहे. मसुरे ग्रामपंचायत भाविकांना योग्य सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. आंगणेवाडी मंडळाची याकडे करडी नजर असून तत्काळ त्या - त्या विभागाला सूचना देऊन काम सुरळीत करून घेताना दिसत आहे. आंगणेवाडी यात्रेसाठी सोमवारी एकाच दिवशी दोन अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या वेळेत घेतलेल्या नियोजनाच्या बैठकीवर स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी नाराज झाले आहेत. सोमवारी सकाळच्या सत्रात जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आंगणेवाडी यात्रेनिमित्त नियोजनासाठी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी तसेच आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष, शासकीय कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सायंकाळच्या सत्रात जिल्हाधिकारी अनिल भंडारी व प्रांताधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी घेतलेल्या नियोजनासाठीही स्थानिक ग्रामस्थ व शासकीय कर्मचारी, पोलीस अधिकारी, आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. या सर्व प्रकाराचा सर्वांना संभ्रम पडला. कारण आंगणेवाडी यात्रेच्या नियोजनाची ही चौथी बैठक होती. मात्र, या बैठकीत दोन अधिकाऱ्यांचा ताळमेळ नव्हता किंवा गटबाजी आहे, असा प्रश्न स्थानिकांना पडलेला दिसत होता. कारण एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच व्यासपीठावर एकाच कारणासाठी दोन्हीही उच्च पदस्थ अधिकारी वेगवेगळ्या वेळेत नियोजनाची बैठक घेतात, त्याचा सर्वाधिक फटका शासकीय कर्मचाऱ्यांना बसताना दिसतो. तसेच व्यापारी वर्ग, स्थानिक ग्रामस्थ व भाविक यांना याचा त्रास होतो. उच्च पदस्थ अधिकारी आल्यामुळे त्यांच्यासमवेत मोठा फौजफाटा तैनात असतो. प्रत्येक अधिकाऱ्याची एक गाडी याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या गाड्यांनी पूर्ण रस्ता दुतर्फा भरून जातो व अधिकाऱ्यांच्या सुरक्षेमुळे पोलीस यंत्रणा फरफटत जातेच. यामुळे व्यापारीवर्गाची मोठी गैरसोय होते. हे या अधिकारीवर्गाच्या लक्षात कधी येणार? यासाठी अशा नियोजनाच्या बैठकींसाठी प्रथम अधिकाऱ्यांनी समन्वय साधूनच वेळ ठरवावी व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थ, व्यापारी, भाविक यांना आपापली कामे लवकरात लवकर करण्यासाठी वेळ द्यावा. त्यातूनच चांगले नियोजन घडेल. अधिकाऱ्यांचेच असे नियोजन राहिल्यास कर्मचाऱ्यांची कुचंबना होताना पहावयास मिळते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर) गतवर्षीची अनामत रक्कमही नाही : वीज जोडणीसाठी व्यापाऱ्यांची तळमळ ४यात्रा एका दिवसावर आली तरी व्यापाऱ्यांना वीज जोडणी मिळालेली नाही. तसेच त्यांना आवश्यक असणारी कागदपत्रांचीही पूर्तता करण्यासाठी अधिकारी उपलब्ध नाही. यामुळे व्यापाऱ्यांनी पालकमंत्र्यांना सर्व प्रकार सांगितला. मात्र, त्यांनाही अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. आर्थिक मंदीच्या सावटाखाली वावरणाऱ्या व्यापारी वर्गाचे हाल महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कसे कळणार? अधिकारी स्थानिक नसल्याने ते असे वागत आहेत असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच अनामत रक्कम तत्काळ न दिल्यास कणकवली येथील महावितरण कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे व्यापाऱ्यांचे एकमत झाले आहे. कारण गेल्यावर्षीच्या यात्रेची अनामत रक्कम अद्याप व्यापाऱ्यांना मिळालेली नाही. यात्रेनंतर मोर्चा काढण्याचा इशारा वीज कंपनीच्या आचरा व विरण येथील कार्यालयामध्ये कार्यक्षम अधिकारी नेमून ग्राहक व्यापारी तसेच सार्वजनिक मंडळांना होणारा त्रास बंद करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास वीज कंपनीच्या दोन्ही कार्यालयांमध्ये यात्रेनंतर मोर्चा काढणार असल्याचे ग्रामस्थांचे व व्यापारी संघटनेचे म्हणणे आहे.