अजित सुनील देसाई (वय २५, रा. आणे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. रमेश ज्ञानू देसाई, अनिमेश रमेश देसाई, ऋषिकेश रमेश देसाई व सुरेश ज्ञानू देसाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेत जमिनीलगत मुरूम का टाकला? असे विचारले असता तुला ठेवतच नाही, तू आम्हाला कोण विचारणार, असे म्हणून अनिमेश देसाई हा हातातील कुऱ्हाड घेऊन विजय बयाजी देसाई यांच्या अंगावर धावून गेला. तसेच रमेश देसाई, ऋषिकेश देसाई व सुरेश देसाई हेदेखील शिवीगाळ करत अंगावर धावून गेले. यावेळी भांडण सोडविण्यासाठी अजित देसाई त्याठिकाणी गेला असता अनिमेश देसाई याच्या हातातील कुऱ्हाड लागून तो जखमी झाला. याबाबतची फिर्याद अजित देसाई याने पोलिसांत दिली असून, पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
कुऱ्हाड डोक्यात लागल्याने युवक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:41 IST