शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

प्रकाशाच्या सणाला पणत्यांची चाहूल!

By admin | Updated: October 18, 2014 23:24 IST

बाजारपेठ सजली : खरेदीसाठी उडालीय झुंबड

सातारा : दिवाळीची चाहूल देणाऱ्या पणत्या बाजारपेठेत डेरे दाखल झाल्या आहेत. पाच रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत असणाऱ्या या पणत्या ग्राहकांना आकर्षित करत आहेत. यंदा तुळशीवृंदावन आकारातील पणत्यांना चांगली मागणी आहे.गत वर्षीप्रमाणेच यंदाही बाजारपेठेत मातीच्या पणत्या दाखल झाल्या आहेत. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता यंदा चिनी मातीच्या पणत्याही मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत आहेत. चकचकित आणि आकर्षक रंगसंगती असलेल्या गुजराथी पणत्याही ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. कॉर्पोरेट जगात आधुनिक आणि पारंपरिक बाज सांभाळत तयार करण्यात आलेल्या पणत्या अधिक खपत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि पणतीला खुलविण्यासाठी जरदोसी वर्कही करण्यात येत आहे. याबरोबरच पणतीवर काच, मणी आणि मोती यांची आकर्षक डिझाईन करण्यात आली आहे. भडक लाल, विटकरी आणि सोनेरी रंगात असलेल्या या पणत्या ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत.ऐन दिवाळीत पणत्यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात, या गोष्टी लक्षात घेऊन बाजारात उपलब्ध असणाऱ्या पणत्या सध्या कमी किमतीत नेऊन ग्राहक ठेवत आहेत. साताऱ्यातील कुंभारवाड्यातही पणत्या तयार करून त्यांची विक्री जोरदारपणे सुरू आहे.यावर्षी पाच रुपयाला एक आणि पन्नास रुपये डझन असे पणतीचे किमान दर आहेत. रंगीत पणती आठ रुपये आणि डिझायनर पणती पंधरा रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तुळशीवृंदावन आकारातील पणती पन्नास ते शंभर रुपयांपर्यंत मिळते. तर गो रूपातील पणती दीडशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. सध्या पणत्या खरेदीसाठी गर्दी झाली आहे. विविध आकारातील आणि रंगीत पणत्या पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहेत. घर आणि अंगण उजळवून टाकण्यासाठी या पणत्या सज्ज झाल्या आहेत. (प्रतिनिधी)