शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

वन्यजीव अभ्यासकांना पाटणच्या निसर्गाची भुरळ

By admin | Updated: September 18, 2014 23:22 IST

‘हरपिटॉलॉजी’ कार्यशाळा : देशभरातील चाळीस अभ्यासकांचा समावेश

पाटण : हरपिटोफॉवन म्हणजे साप, बेडूक, पाल, सरडे अशा वन्यजीवांच्या अभ्यासासाठी शनिवार दि. २७ पासून पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात चार दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेसाठी देशभरातील ४० वन्यजीव अभ्यासक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉ. एस. डी. पवार व प्रा. डॉ. बापूराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.सातारा जिल्ह्याचा पश्चिम घाट निसर्गसंपदेने नटलेला आहे. झाडावेलींबरोबरच वन्यजीवांची वैविध्यता हे येथील वैशिष्ट्य आहे. विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी येथे आढळतात. म्हणूनच पाटण तालुक्यातील जैवविविधेचे महत्त्व ओळखून येथे हरपिटोफॉवन राष्ट्रीय कार्यशाळा भरविण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत देशभरातील ४० वन्यजीव अभ्यासक सहभागी होणार आहेत.साप, बेडूक, पाल, सरडे व सिसिलीयन या जाती नष्ट होत चालल्या आहेत. यावर निसर्गप्रेमी संशोधकांनी अभ्यास करावा म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग व राजीव गांधी प्राणी संग्रहालय (सर्प उद्यान) कात्रज यांच्या सहयोगाने कार्यशाळा आयोजित केली आहे.या कार्यशाळेत साप, बेडूक, सरडे, पाली, देवगांडूळ इत्यादी वन्यजीवांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्यक्ष भेटीद्वारे अभ्यास केला जाणार आहे. यासाठी सर्प उद्यानाचे संस्थापक नीलमकुमार खैरे, अशोक कॅप्टन, डॉ. वरद जोशी, अनिल खैरे, डॉ. डी. बी. कदम, केदार भिडे, डॉ. एच. व्ही. घाटे, डॉ. अनिल पाध्ये, डॉ. अनिरुद्ध जोशी, दीपक सावंत, राजन शिर्के, विशाल प्रसाद मार्गदर्शन करणार आहेत. भारतीय हरपिटॉलॉजिकल सोसायटीचे चेअरमन अनिल खैरे यांचेही या कार्यशाळेस योगदान लाभले आहे. (प्रतिनिधी)