शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

चाळीस वर्षांपासून पाण्याची आस!

By admin | Updated: November 20, 2015 00:07 IST

वाई तालुक्याचा पश्चिम भाग : कृष्णेचे पाणी शिवारात येणार का?

 संजीव वरे -- वाई तालुक्यात धोम धरणाच्या निर्मितीला चाळीसहून अधिक वर्षे लोटली आहे. धरणात येथील शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या, अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. धरणामुळे राज्यातील हजारो एकर जमिनी ओलिताखाली आहे. मात्र, धरणाच्या काठावरील व शेतीपाण्यापासून वंचित असलेल्या गावातील शेतकऱ्यांची जमीन तहानलेली आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने जललक्ष्मी योजनेतून पाणी देण्याची मागणी होऊ लागली आहे.वाई तालुक्याच्या पश्चिम भागात कृष्णा नदीवर धोम व बलकवडी ही दोन धरणे बांधण्यात आली. या भागात दरवर्षी पावसाचे प्रमाण जास्त असते; परंतु यावर्षी पाऊस कमी पडल्याने बलकवडी धरण भरले. परंतु धोम धरणात सरासरी चाळीस टक्केच पाणीसाठा झाला आहे. परिणामी सर्वत्र दुष्काळी व पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होत आहे. धोम धरणनिर्मितीच्या वेळी धरणाच्या काठावरील व शेतीपाण्यापासून वंचित असलेल्या गावांना सहा टक्के पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला होता. व शासनाच्या वतीने जललक्ष्मी योजना करून दिली जाणार होती. या योजनेसाठी येथील जनतेने मोठा लढा दिला. यावर्षी सर्वत्र पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट सामोरे येत आहे. जललक्ष्मी योजनेतून पाणी सोडावे ,अशी मागणी या परिसरातील शेतकरी व जनतेतून होऊ लागली आहे. त्यामुळे कृष्णेचे पाणी शिवारात पाहण्याची चाळीस वर्षांपासूनचे स्वप्त आता तरी पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या योजनेतून पाणी सोडण्याची मागणी माजी सभापती विजयसिंह नायकवडी, बाजार समितीचे संचालक दत्ता भणगे, महादेव वाडकर, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष महेंद्र पुजारी, मालतपूरचे माजी सरपंच किसन वाडकर, दसवडीचे सुनील फणसे, कुसगावचे उपसरपंच विनायक वाडकर, आनंदराव हगवणे, सदाशिव वरे, हरिभाऊ वरे, एकसरचे माजी सरपंच रघुनाथ मालुसरे, बाळकृष्ण तरडे, पसरणीच्या उपसरपंच शुभांगी महांगडे, विलास येवले, बाजीराव महांगडे, माजी सरपंच बाबू शिर्के आदींनी आमदार मकरंद पाटील यांच्याकडे केली आहे. ४५ कोटींचा निधी आलाया योजनेसाठी चाळीस वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. अखेर बलकवडी धरणाच्या या पाण्यात या योजनेची जलवाहिनी टाकली गेली. धोमधरणातील राखीव पाणीसाठा व बलकवडी धरणात ठेवून बंदिस्त जलवाहिनेने बलकवडी ते वाई ग्रामीण अशी सुमारे २५ किलोमीटर अंतराहून जास्त लांबून पाणी आणले गेले आहे. मकरंद पाटील या मतदारसंघाचे आमदार झाल्यानंतर ४५ कोटींचा निधी उपलब्ध झाला. संपूर्ण सिमेंट जलवाहिनी व जागोजागी पाणी वितरणाची दारी व एअरव्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. दुष्काळी भागाला पाणी सोडणारयावर्षी महाबळेश्वर आणि धोम, बलकवडी धरण परिसरातही पाण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. त्यामुळे धोम धरणात फक्त चाळीस टक्केच पाणीसाठा झाला. गेल्या काही दिवसांत बलकवडी धरणातून धोम धरणात मोठ्या प्रमाणात सोडले आहे. त्यामुळे दुष्काळी भागाला व दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन पाणी नियोजनाच्या तयारीला लागले आहे.