शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

‘तोतया शोभा राजपाल’ अटकेत

By admin | Updated: January 23, 2015 00:37 IST

गूढ उकलू लागले : पाचगणी बनावट जमीन व्यवहाराचा तुषार खरात सूत्रधार

पाचगणी : अभिनेता आमीर खान याचे बंधू मन्सूर नासीर हुसेन खान व अभिनेता संजय दत्तचे वकील सी. बी. वाधवा यांची कन्या शोभा राजकुमार राजपाल यांची भिलार येथील सामायिक जमीन परस्पर विकल्याच्या गुन्ह्याचे गूढ उकलण्यास सुरूवात झाली आहे. या गुन्ह्यातील ‘ती’ तोतया महिला व तीन पुरूष संशयितांना जेरंबद करण्यात पाचगणी पोलिसांना यश आले.तुषार सुधीर खरात हा या प्रकरणाचा ‘मास्टरमार्इंड’ असल्याचे स्पष्ट होत आहे.भिलार येथे मन्सूर खान व शोभा राजपाल यांची एकत्रित जमीन आहे. ती अनेक वर्षे पडिक असल्याचा फायदा घेत तोतया शोभा राजपालने तिची बनावट मुले उभी करून त्यांची खोटी कागदपत्रे जमा करून ही जमीन परस्पर विकल्याचे उघडकीस आले होते. संबधित महिलेने लक्ष्मण भणगे आणि दिलीप गोळे या स्थानिकांना आपले सावज बनवून कमी किमतीत जमिनीचा व्यवहार केला. तलाठ्याच्या सतर्कतेमुळे ही बाब उघडकीस आली. मूळ शोभा राजपाल यांचे चिरंजीव विनायक यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात लक्ष्मण भणगे, दिलीप गोळे, तोतया शोभा राजपाल, वैभव राजपाल, सचिन राजपाल, विशाल गोळे, जय भणगे, अ‍ॅड. रामदास माने व महाबळेश्वरच्या तालुका निबंधकांविरुद्ध तक्रार दिली.पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी तपासाची सूत्रे गतिमान केली. दोन दिवसांपूर्वी यातील मुख्य सुत्रधार तुषार खरात (वय २७, मूळ गाव दांडेघर, ता.महाबळेश्वर, सध्या रा. खडकी-पुणे), सचिन गंगाराम वेताळ (वय २६, रा. धानोरी-पुणे) या दोघांना पुण्यातून ताब्यात घेतले तर चंद्रकांत शांताराम अहिरे (वय २४, रा. नाशिक) याला नाशिक येथून ताब्यात घेतले होते. काल रात्री वाईचे उपविभागाीय अधिकारी हुंबरे व भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार लक्ष्मण येवले, हेड कॉन्स्टेबल सत्यवान बसवत, मुबारक सय्यद, माधुरी दीक्षित यांचे पथक नाशिकला गेले. तोतया शोभा राजपालचे खरे नाव सुनंदा प्रकाश चंद्रमोरे (वय ४५) असल्याचे स्पष्ट झाल्यांनतर या पथकाने मोठ्या शिताफीने तिला टकसाळवाडी, नाशिकातील झोपडपट्टीतून ताब्यात घेतले. ती नाशिकातील न्यायालयात नोकरीस असल्याचे समोर आले. (प्रतिनिधी)कुणाकुणाला घातला गंडा?‘मास्टरमांइंड’ तुषार खरात हा मूळचा पाचगणीजवळीलच दांडेघरचा असल्याने परिसरातील बरीच माहिती त्याला आहे. मोक्याच्या जागांची माहीती घेऊन त्याने स्थानिक एजंटांना जाळ्यात ओढून सावज हेरले व बनावट दस्तावेजांच्या आधारे त्यांना फसवले.