शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
5
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
6
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
7
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
8
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
9
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
10
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
11
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
12
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
13
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
14
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
15
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
16
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
17
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
18
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
19
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
20
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

पालकमंत्रिपदाचे लाल ‘दिवास्वप्न’

By admin | Updated: September 18, 2014 23:24 IST

लगाव बत्ती -

दाभोलकरांच्या सातारा जिल्ह्यात भोंदू बुवांची वर्दळ कमी असली तरी राजकीय बुवाबाजीची चलती मात्र जोरात. निवडणुकीच्या तोंडावर दलबदलू आयाराम-गयारामांचा तर धुमाकूळ भलताच. आयुष्यभर जातीयवादावर सडकून टीका करणारे नेते एका रात्रीत भगवा हातात घेतात, तेव्हा त्यांचेच कार्यकर्ते होतात आचंबित. यंदा तर एकमेकांच्या पक्षात प्रवेश करण्याची ही ‘एक्स्चेंज स्कीम’ फुल्ल फॉर्मात पळू लागलीय. चेहरा तोच. आश्वासनं तीच. फक्त चिन्ह बदलून अनेकजण लागलेत जोरदार प्रचाराला .देशात ‘मोदींची लाट’ टिकून राहिलीय की नाही, माहीत नाही. परंतु जिल्ह्यात मात्र ‘अदलाबदल’ची त्सुनामी लाट उसळलीय. मूळचे शिवसेनेचे दगडू सपकाळ आता काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. ‘आप’ची टोपी उतरवून राजेंद्र चोरगे शिवसेनेत गेलेत. महाबळेश्वरात ‘काँग्रेसचा हात’ सोडून डी. एम. बावळेकर ‘हातात शिवबंधन’ बांधून फिरू लागलेत. खंडाळ्यात सेनेचे पुरुषोत्तम जाधव ‘दादा.. कमळ बघा’ म्हणत इतरांना वाकुल्या दाखवू लागलेत. ‘मनसे’चे रणजित भोसले पुन्हा शिवसैनिक बनलेत. फलटणमध्ये तर रामराजेंचे समर्थक राजेंद्र काकडे चक्क शिवसेनेचे तालुकाप्रमुख बनलेत. बाकीच्या ठिकाणीही परिस्थिती जवळपास तशीच. सर्वांची नावं लिहिता-लिहिता बिचारया पामराची लेखणीही थकून जावी, इतकी !‘उजडेल तिथं उजडेल’ अशी धाडसी भूमिका घेऊन भाजप-सेनेत प्रवेश केलेल्यांचे चेहरे सातारकरांना माहीत झालेत. मात्र, ‘महायुती’च्या जागावाटपानंतर उघडपणे भगवा झेंडा घेऊन बाहेर पडू इच्छिणाऱ्यांची संंख्या कदाचित यापेक्षाही मोठी. कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटतो, यावर आपल्या उमेदवारीची गणितं बांधणाऱ्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच. विशेष म्हणजे एकच इच्छुक उमेदवार ‘महायुती’तील तीन-चार पक्षांसोबत गुप्तपणे संधान बांधून. त्यामुळं प्रत्येक घटक पक्षाला वाटतंय की, ‘आपल्याकडेच केवळ स्ट्राँग उमेदवार. तेव्हा अमुक-तमुक मतदारसंघ आपल्यालाच हवा!’ कदाचित, या कारणामुळंच ‘महायुती’च्या जागावाटपाचं घोडं अडलंय.‘काँग्रेस-राष्ट्रवादी’तून बाहेर पडून ‘सेना-भाजप’मध्ये जाणाऱ्या इच्छुकांचं साधं सरळसोट गणित म्हणजे, ‘महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं तर पालकमंत्रिपदावर दावा ठोकायला मातब्बर नेता आहेच कोण? मी निवडून आलो तर थेट मंत्रिमंडळात... अन लाल दिव्यांची गाडी डायरेक्ट माझ्या दारात!’ विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व आठही मतदारसंघात अनेकांना आगामी पालकमंत्र्यांचे लाल ‘दिवास्वप्न’ पहाटेच्या वेळी पडू लागलंय. आता बोला!-सचिन जवळकोटे