किडगाव : किडगाव, ता. सातारा येथील वेण्णा नदीवर नवीन बांधण्यात आलेल्या पुलाचा भराव एकदा नव्हे तर दोनदा वाहून गेल्याने या मार्गाची सर्व वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने कण्हेर धरणातून वेण्णा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते.पहिल्यांदा किडगाव बाजूला या पुलाला सिमेंट कट्टा नसल्यामुळे भराव वाहिला होता. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांनी स्वत:च्या खर्चातून हा भराव टाकला होता. मात्र, गेली पंधरा दिवसांपूर्वी हा भराव पुन्हा वाहून गेल्याने किडगाव-नेले, धावडशी, पिंपळवाडी, कळंबे, दत्तनगर येथील वाहनचालकांची चांगलीच पंचाईत झाली होती.किडगाव येथील काही युवकांनी दुचाकी जाईल एवढा रस्ता बनवला होता. मात्र, रिक्षा व इतर वाहने येथून जात नव्हती. नेते लक्ष देणार नाही, ही गोष्ट लक्षात येताच काहीच लोकांनी स्वत:हून पैसे गोळा करून प्रत्येक वाहन चालकाने स्वत:हून पैसे देऊन या पुलाला दोन्ही बाजूने वाहून गेलेला भराव टाकून रस्ता सुरू करण्यात आला. (वार्ताहर)किडगाव परिसर दुर्लक्षित राहिला आहे. दहा वर्षांपासून जास्त वर्षांनंतर पूल झाला; मात्र तोही अर्धवटच. सर्व नेते निवडणुकीत गुंतले आहेत. आम्ही वर्गणी काढून आम्ही पुलाला भराव टाकला आहे.- रमेश इंगवले, किडगाव
किडगाव-हामदाबाज पुलाला लोकांची मदत
By admin | Updated: September 20, 2014 00:35 IST