लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात या वर्षात क्षयरोगाचे .... रूग्ण आढळले आहेत. केंद्र शासनाच्या नि:क्षय योजनेचा जिल्ह्यातील .... क्षयरोग रूग्णांना लाभ मिळतो. या योजनेतून क्षयरूग्णांना मोफत औषधोपचार देण्याबरोबरच सकस पोषण आहारही देण्यात येतो.
जिल्ह्यात अजूनही क्षयरोगाचे रूग्ण आढळत आहेत. शासनाच्या निकषाप्रमाणे एक लाख लोकसंख्येमागे १६० ते २०० क्षयरोगी असतात. मात्र, सातारा जिल्ह्यात या रूग्णांचे प्रमाण संतुलित आहे. तरीही शासनाच्या आरोग्य यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष पुरविले आहे.
क्षयरोग रूग्णांचे निदान करून याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत. जे क्षयरूग्ण उपचार घेत आहेत, त्यांना नि:क्षय पोषण योजनेतून दर महिन्याला ५०० रूपये देण्यात येतात. या रूग्णांना औषधे शासनाकडून मोफत मिळतात. रूग्णांना औषधोपचारासह सकस आहार मिळावा, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ रूग्णांना उपचार सुरू असेपर्यंत दिला जातो.
चौकट :
जिल्ह्यातील क्षयरोगी :
भत्ता किती जणांना मिळतो :
न मिळणाऱ्यांचे प्रमाण :
टीबीची लक्षणे काय?
रात्री येणारा ताप, १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत खोकला, छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, वजन कमी होणे, भूक कमी होणे ही टीबीची लक्षणे आहेत. यातील कोणतेही लक्षण आढळून आले तर लगेचच थुंकीची तपासणी करणे आवश्यक आहे.
जास्तीत जास्त २८ महिन्यांत टीबीमुक्त
टीबीच्या रूग्णांचे वेळीच निदान झाले तर तो रूग्ण सहा महिन्यात पूर्णपणे बरा होण्याची शक्यता अधिक आहे. एमडीआर टीबी नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे २८ महिन्यांचा कालावधी लागतो.
कोट :
दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत खोकला, छातीत दुखणे, ताप, खोकल्यातून रक्त पडणे अशी लक्षणे आढळून आली तर जवळच्या रूग्णालयात थुंंकी तपासणी किंवा एक्स-रे काढून घेणे गरजेचे आहे. खासगी रूग्णालयांनाही टीबीच्या रूग्णांची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
-