लोकमत न्यूज नेटवर्कअंगापूर : गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेल्या अंगापूर-निगडी रस्त्याच्या कामास अखेर सुरूवात झाली; पण हे काम ठेकेदार निकृष्ठ दर्जाचे करत असल्याचा आरोप करत अंगापूर ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते. अखेर दर्जेदार काम करून देण्याचे अश्वासन ठेकेदाराने व संबंधीत विभागाच्या प्रतिनिधींनी दिल्यानंतर रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे दुर्लक्षीत राहिलेल्या सातारा तालुक्यातील अंगापूर, निगडी, कामेरी हा रस्ता या परिसरातील नागरिकांच्यासाठी दळणवळणाच्यादृष्टीने अंत्यत महत्त्वाचा असतानाही दुर्लक्षीत होता. मूळातच गेली अनेक वर्षे दुर्लक्षीत राहिलेल्या रस्त्याची अवस्था पाहण्यासारखी झालेली आहे. रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे. या रस्त्यावर वाहनचालक कसरत करीत वाहन चालवताना दिसत आहेत. तर छोटे मोठे अपघात घडत होते. अंगापूर हे या परीसरातील बाजार पेठेचे गाव आहे. तसेच बँक, शाळा, कॉलेज अंगापूरला असल्यामुळे गेली अनेक वर्षे निगडी, कामेरी फत्यापूर, धोंडेवाडी या गावातील नागरिक, विद्यार्थी प्रवास करत आहेत. मतदार संघातील शेवटच्या टोकाची गावे असल्याने या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले होते. परंतू गेल्या सहा महिन्यांपूर्वी या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला. संबंधीत ठेकेदाराने त्या रस्त्यावर खडीसूध्दा टाकली होती. मुळात खड्याचा रस्ता त्यात भर म्हणून ठेकेदाराने खड्डी टाकल्याने अडचणीत भर पडलेली होती. कामास सुरूवात होईल व या अडचणी कमी होतील म्हणून नागरिक या अडचणीतून प्रवास करत होते. परंतू संबंधीत ठेकेदाराने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करत असताना छोटे मोठे अपघात घडत होते. यामुळे संबंधीत विभाग याकडे लक्ष कधी देणार ? पावसाळ्यापूर्वी काम होणार का ? असे या परिसरातील नागरीक संतापजनक प्रश्न करीत होते. मात्र काही दिवसांपासून रस्त्याच्या या कामास सुरूवात झाली असल्यामुळे या रस्त्याची प्रतिक्षी संपली आहे. त्यामुळे या भागातील वाहन चालक व परिसरातील लोक समाधान व्यक्त करीत आहेत. ठेकेदाराला सूचना...ठेकेदार हे काम निकृष्ट दर्जाचे करत असल्याचे जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष धंनजय शेडगे, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास शेडगे, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र शेडगे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. माणिक शेडगे, रणजित शेडगे, जयवंत शेडगे, मनोहर येवले, संतोष शेडगे यांच्यासह ग्रामस्थांनी निदर्शनास आणून देत काम बंद पाडले होते. त्यानंतर संबंधीत विभागाशी संपर्क करून ही बाब कानावर घातली. ही बाब चुकीची असल्याने संबंधीत विभागाचे प्रतिनिधी या ठिकाणी आले व त्यांनी हे काम चुकीच्या पध्दतीने चालले असल्याचे मान्य केले. संबंधीत ठेकेदाराला योग्य सूचना केल्या.
रखडलेल्या कामाला अखेर मुहूर्त
By admin | Updated: May 9, 2017 23:32 IST