शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
2
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
3
IPL 2025 : शाहरुख खान काटावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
4
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
5
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
6
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
7
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
8
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
10
Vaishnavi Hagawane case: अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी 
11
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
12
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
13
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
14
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
15
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
16
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
17
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
18
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
19
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
20
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न

टिचभर पोटासाठी मैलोन्मैल पायपीट

By admin | Updated: October 25, 2015 23:32 IST

मेरुलिंगमधील वृद्धांची परवड : दुर्मिळ रानमेव्याच्या विक्रीसाठी कसरत

सायगाव : साठीनंतरचं वय हे खरंतर निवृत्तीचं. निवांत पेन्शन घेऊन नातवंडांना अंगाखांद्यावर खेळवत विश्राम करण्याचा हा कालावधी. आयुष्याच्या या उत्तरायणातही ज्यांच्या पोटातली भुकेची आग तप्त असते. त्यांच्यासाठी साठी हा फार तर एक टप्पा असतो. चढणीला खरी सुरुवात येथून होते. शरीर साथ देत नसतं आणि पोट या वयात कुठं-कुठं नेत असतं. वयाच्या सत्तरी-पंचाहत्तरीतही रानोमाळ भटकून चिचुर्डीसारख्या वनौषधींची विक्री करण्यासाठी मैलोन्मैल भटकणाऱ्या वृद्धांची ही आहे दर्दभरी व्यथा. मेरुलिंग हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, या डोंगरदऱ्यात वास्तव्य करून असणारा बहुतेक धनगर समाज अनेक संकटांना तोंड देत हलाखीचे जीवन जगत आहे. उपजीविकेसाठी मुंबईला स्थलांतरित झालेले स्थानिक माथाडीमध्ये मजुरी करतात. गावाकडं असणारे वृद्ध अशावेळी पशुपालन आणि शेतमजुरीत स्वत:ला गुंतवून घेतात; मात्र यातून पोट भरत नसल्यामुळे हंगामी रानमेवा विकून आपली गुजराण करतात. करवंद, जांभूळ, कडीपत्ता आणि चिचुर्डीसारख्या वनौषधींची विक्री करतात.सध्या चिचुर्डीचा हंगाम आहे. सत्तरी-पंचाहत्तरी ओलांडलेले वृद्ध हाळ्या मारून आपल्या वनौषधीची विक्री करीत आहेत. त्यासाठी रोज सोळा ते वीस किलोमीटर पायपीट करीत आहेत. मेरुलिंगचा सरळसोट डोंगर उतरून पंचक्रोशीतील गावांमध्ये हे रानमेवा विकतात. त्यासाठी त्यांना आदल्यादिवशी डोंगर पालथा घालून काट्याकुट्यातून चिचुरटे गोळा करावे लागते. जंगली श्वापदे आणि सापांचा कायम धोका असतो आणि एवढे करूनही केवळ ६० ते १०० रुपये मिळत असल्याने उपजीविकेचा हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. (वार्ताहर)वयाच्या ६५ व्या वर्षीही वालाबाई हिरवे या आजी लटपटत्या शरीराने एकेक पाय उचलत खांद्यावर वनौषधीची पिशवी घेऊन दारोदार फिरत आहेत. मुलगा मुंबईला कष्टमय आयुष्य जगत आहे. घरी आजारी पती. वालाबार्इंना आॅपरेशन झाल्यामुळे रक्त बदलावे लागते. शरीरात पाणी होऊन सर्वांग लटपटू लागले. याही अवस्थेत पोट भरणे भाग आहे, त्यामुळे त्या आठवड्याला गावोगाव फिरून चिचुर्डी विकून उपजीविका करीत आहेत. या आजींसारखे कितीतरी वृद्ध आज या विक्रीवर जीवन कंठत आहेत; पण काही केल्या पोट भरत नाही. टिचभर पोटासाठी मैलोन्मैल पायपीट कधी संपणार, याचे कुणाकडेच उत्तर नाही.चिचुर्डीचे औषधी गुण चिचुर्डी हे एक स्थानिक फळ आहे. याचा आकार छोट्या बोराएवढा असून, चव अत्यंत कडवट असते. पित्त आणि मधुमेहावर हे अत्यंत गुणकारी असून, हे बाजारपेठेत कोठेही मिळत नाही. शंभर ग्रॅमला दहा रुपये एवढी माफक किंमत असूनही याला अपेक्षित बाजारपेठ मिळत नाही. त्यामुळे काहीकाळाने हा रानमेवा नामशेष होण्याची शक्यता आहे.