पळशी : कोरेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या बैलजोडी सजावट स्पर्धेस चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात कोरेगाव, ल्हासुर्णे, रहिमतपूर येथील बैलजोड्या पारितोषिकासाठी पात्र ठरल्या. बैलांचे ऋण लक्षात घेवून पूर्वीचा उत्साह पुन्हा निर्माण व्हावा, त्याचे महत्त्व वाढावे, या उद्देशाने बैलजोड्यांच्या स्पर्धात्मक मिरवणुकीचे आयोजन केले होते. त्यात पहिल्या पाच विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार, दोन हजार, एक हजार व पाचशे रुपयांचे रोख बक्षीस तसेच तीन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्याचेही जाहीर केले होते. त्यानुसार सरपंच विद्या येवले, उपसरपंच मंदा बर्गे, सदस्य प्रदीप बोतालजी, नीता बर्गे, दिलीप बर्गे, संभाजी पवार, मनीषा सणस, संजय पिसाळ, विनया निदान, राहुल बर्गे, संतोष चिनके, रसिका बर्गे, प्रतिभाताई बर्गे, शीतल पिसे, महेश बर्गे, सुनील बर्गे, मनीषा होळ यांनी तालुक्यातील बैलजोडी मालकांना या मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सर्व सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरेगाव येथील बाजार समितीपासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यात पारंपरिक वाद्ये, सनई, पिपाणी गजी नृत्य सहभागी झाल्याने मिरवणुकीत रंग भरला. मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.दरम्यान, बैलजोडी सजावट स्पर्धेतील विजेत्यांची नावे ग्रामपंचायतीतर्फे नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानुसार संजय बर्गे, तानाजी पवार (कोरेगाव) यांच्या जोडीने प्रथम, शरद बर्गे, हेमंत बर्गे (कोरेगाव), जाधव माने (ल्हासुर्णे) यांच्या जोडीने दुसरा, हरी बोकील, दत्तात्रय बर्गे, राजू भिलारे (कोरेगाव) यांच्या जोडीने तिसरा, तर संजय बर्गे (कोरेगाव), प्रल्हाद माने (रहिमतपूर) यांच्या जोडीने चौथा क्रमांक मिळवला. विजय बर्गे, सुरेश बर्गे, दीपक माळी, दीपक चव्हाण जोडीने उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली. (वार्ताहर)नागपंचमीचेही नियोजनसांस्कृतिक परंपरा टिकवण्यास मदत व्हावी, या उद्देशाने नागपंचमी, मंगळागौर आदी सण सार्वजनिक स्वरूपात साजरे करण्याचा प्रयत्न यापुढे होणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे नियोजन करण्यात येत असल्याचे सरपंच विद्या येवले, उपसरपंच मंदा बर्गे यांनी स्पष्ट केले.
बैलजोडी सजावट स्पर्धेत कोरेगाव अव्वल
By admin | Updated: August 10, 2015 21:20 IST