कऱ्हाड : राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्याचा मान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे यावर्षी कऱ्हाडला मिळाला आहे़ या स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात होणार असून, पुरुष व महिला गटातील प्रत्येकी १६ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत़ कऱ्हाड कबड्डी असोसिएशन या स्पर्धा आयोजित करणार असून, १० फेब्रुवारी ते २५ फेबु्रवारी या कालावधीत या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत़ साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन आणि कऱ्हाड कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष झाकीर पठाण, अध्यक्ष जितेंंद्र पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लवकरच होणार आहे़आमदार आनंदराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभलेल्या या स्पर्धा झाकीर पठाण यांच्या प्रयत्नाने होणार आहेत. शिवाजी स्टेडियमवर या स्पर्धा आयोजित करण्याचा विचार असून, त्या पाच दिवस चालणार आहेत़ ‘अर्जुन’ पुरस्कार प्राप्त आणि कऱ्हाड तालुक्यातील कबड्डीसाठी योगदान देणाऱ्या खेळाडूंचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे़, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)
कऱ्हाडला होणार राज्यस्तर कबड्डी स्पर्धा
By admin | Updated: January 2, 2015 23:59 IST