शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

जैवविविधता समिती असती तर...

By admin | Updated: August 26, 2014 21:50 IST

कायद्याने बंधनकारक : अंमलबजावणी असती तर टळली असती साताऱ्यातील पूरस्थिती

सातारा : पर्यावरणविषयक कायदे होतात; पण त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने आफत ओढवते, हे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे साताऱ्यात तंतोतंत खरे ठरले आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने जैवविविधता व्यवस्थापन समिती (बायोडायव्हर्सिटी कमिटी) स्थापन करणे बंधनकारक असूनही कायद्याचे पालन झाले नाही. परिणामी, नैसर्गिक घटकांमध्ये होत असलेल्या बदलांवर, हस्तक्षेपांवर लक्षच राहिले नाही आणि गेल्या आठवड्यातील मानवनिर्मित पूरस्थिती ओढवली.जैवविविधता कायदा २००२ मध्ये अस्तित्वात आला. विविध रूपांंतील ‘जीवन’ संवर्धित करणे हा या कायद्याचा हेतू आहे. निसर्गचक्रात होणारे हस्तक्षेप माळीणसारख्या दुर्घटनेपासून गोडोलीतील पुरापर्यंत अनेक धोक्यांना निमंत्रण देतात, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळेच जीवनसंवर्धनाचे काम स्थानिक पातळीवर होणे कायद्याला अपेक्षित आहे. यासाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने जैवविविधता समिती स्थापन करावी, असे या कायद्यात नमूद केले आहे. राज्य जैवविविधता मंडळाच्या माध्यमातून केंद्रीय जैवविविधता प्राधिकरणाशी सर्व समित्या जोडल्या जाऊन एक साखळी तयार होणे अभिप्रेत आहे. याकामी आराखडे तयार केल्यास जैवसंपदेच्या जतनासाठी निधीही उपलब्ध होऊ शकतो. जैविक विविधतेच्या देणगीमुळेच साताऱ्याचे नाव जागतिक नकाशावर ठळकपणे आले. डोंगरउतारावर वसलेल्या, वन्यजीवांचा शेजार लाभलेल्या या शहराने अशी समिती स्थापन करून राज्यात आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा नुकत्याच उद््भवलेल्या पूरस्थितीनंतर व्यक्त होत आहे.अशी समिती असती तर विकासकामांच्या आराखड्यांची तज्ज्ञांकडून तपासणी झाली असती आणि नैसर्गिक बाबींचा विचार करून अभिप्राय दिला गेला असता. तसेच शहराला असणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित धोक्यांबाबत पूर्वसूचना मिळणे शक्य झाले असते. पर्यायाने ्रपुरामुळे झालेले नुकसान टाळता आले असते. (प्रतिनिधी)साताऱ्याला का उपयुक्त?डोंगरउतारावरील शहर असल्यामुळे निसर्गातील हस्तक्षेपामुळे होणाऱ्या परिणामांची पूर्वकल्पनानिसर्गात होणाऱ्या घातक हस्तक्षेपांवर नजर पालिकेच्या नगररचना विभागाला विविध विषयांत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपालिकेच्या शिफारशीवर राज्य मंडळ नवी वारसास्थळे घोषित करू शकतेकेंद्रीय प्राधिकरणाशी सल्लामसलत करून वारसास्थळांसाठी नियमावली शक्यजैवसमृद्ध स्थळ जोपासताना कोणी विस्थापित होत असेल तर पुनर्वसनासाठी निधीसमितीत कोण असावे?जैवविविधता समितीत जलस्रोततज्ज्ञ, भूगर्भतज्ज्ञ, भूरचनाशास्त्रज्ञ, प्राणितज्ज्ञ, वनस्पतितज्ज्ञ, परिसरविज्ञान तज्ज्ञ यांबरोबरच आपत्कालीन व्यवस्थापनतज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांचा अंतर्भाव असू शकतो. या सर्व क्षेत्रांत संशोधन करणारे तज्ज्ञ साताऱ्यात उपलब्ध आहेत आणि ही साखळी जोडल्यास विविध मार्गांनी येणारे धोके ओळखण्यास आणि आपत्ती निवारणास मदत होऊ शकते.१ समितीची कामे कोणतीपरिसरातील जैवसंपत्तीचे संवर्धन आणि शाश्वत वापर२ परिसरातील नैसर्गिक अधिवासांची नोंद आणि जतन३ - पाळीव पशुधन आणि अन्य प्राणिसंपदेची नोंद४ - स्थानिक वाणांची नोंद आणि संवर्धन५व्यावसायिक कारणांसाठी होत असलेल्या जैवसंपत्तीच्या वापराची दरनिश्चिती करून पालिकेला उत्पन्न मिळवून देणे