रशिद शेख- औंध --औंध हे संस्थान सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील एक नावाजलेले व आदर्शगाव म्हणून ओळखले जाते. दहा दशकांपासून औंधसारख्या लोकाभिमुख असणाऱ्या संस्थानकालीन गावाची स्वातंत्र्यानंतर मोठी पिछेहाट झाली. देशाला नामवंत लेखक, कलाकार, उद्योगपती, संगीत, सांस्कृतिक वारसा देणारे छोटेसे औंध संस्थान पूर्ण मागे पडले. दळणवळण, व्यापार शैक्षणिक सुविधा यामध्ये मागील ३० वर्षांमध्ये औंधची पूर्ण वाताहात झाली होती; परंतु मागील दहा वर्षांपासून औंध संस्थानच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी गावच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणून गावचा चेहरा-मोहराच बदलून टाकला आहे.औंध संस्थानचे तत्कालीन अधिपती श्रीपतराव पंतप्रतिनिधी राजे व बाळराजे पंतप्रतिनिधी यांनी १९९१ ते १९९९ या कालखंडात औंध गावाला वेगवेगळ्या व भरपूर सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून शासनदरबारी प्रयत्न केले; परंतु त्यांच्या आकस्मिक निधनानंतर औंध गावच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्यावर येऊन पडली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून औंध जिल्हा परिषद गटाची त्यांनी पोट निवडणूक लढवून त्यांनी राष्ट्रवादीच्या राज्यातील पहिल्या महिला जिल्हा परिषद सदस्या होण्याचा मिळविला. त्यानंतर त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा बनल्या. जिल्हा व तालुका पातळीवरील जबाबदारी सांभाळताना औंध गावच्या सर्वांगीण विकासाला त्यांनी प्राधान्य दिले.औंधचा कायापालट करण्यात गायत्रीदेवी यांच्याबरोबर सतत त्यांच्याबरोबर राहण्यामागे माजी सभापती सोनाली खैरमोडे, हणमंत शिंदे, राजेंद्र माने, दीपक नलवडे, रमेश जगदाळे, इलियाज पटवेकरी, सचिन शिंदे, आब्बास आतार, चंद्रकांत कुंभार, शंकर खैरमोडे, सरपंच रोहिणी थोरात, उपसरपंच बापूसाहेब कुंभार, श्री बाळराजे प्रतिष्ठान, संस्थांचे पदाधिकारी युवक, ग्रामस्थांचे सहकार्य लाभते.आधुनिकीकरणाला वेग माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी अनेक विकासकामे केली. यामध्ये ग्राम सचिवालयाची सुसज्ज इमारत, ग्रामीण रुग्णालय, विश्रामगृह, अंतर्गत रस्ते, गटारांचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण, औद्योगिक प्रशिक्षण, संस्थेच्या इमारतीचे काम, स्ट्रीट लाईटस, श्री यमाई देवी मूळपीठ रस्ता, श्री भवानी चित्र संग्रहालय, नवीन इमारत, शैक्षणिक संस्थेच्या सुसज्ज इमारती, औंधचा शैक्षणिक विकास, भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचा सिंहाचा वाटा आहे. महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत असताना बचत गटाच्या माध्यमातून महिलांची संघटित ताकद त्यांनी निर्माण केली आहे. गावात असणारे महिला स्वयंसहाय्यता बचत गट हे त्याचे द्योतक म्हणावे लागेल. मुलींच्या शिक्षणासाठी आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देण्यात गायत्रीदेवी अग्रेसर असतात.
ऐतिहासिक ‘औंध’नं पुन्हा एकदा कात टाकली!
By admin | Updated: April 23, 2016 00:41 IST