कऱ्हाड : शहरातील प्रारूप विकास आराखड्यातील बाधित ५४२ मिळकतधारकांच्या हरकतीबाबत गुरूवार दि़ १ पासून प्रत्यक्षपणे सुनावणीस सुरूवात करण्यात आली़ कऱ्हाड नगरपालिकेमध्ये गुुरूवार व शुक्रवार अशा दोन दिवसांत शहरातील ५४२ मिळकतधारकांकडून हरकतींबाबत सुनावणी घेण्यासाठी शासनाकडून एका नियोजन समितीचे गठन करण्यात आले असून, या समितीसमोर पात्र मिळकतधारकांनी आपल्या समस्या व अडचणी मांडण्यासाठी कऱ्हाड नगरपालिकेमध्ये हजेरी लावली़ या ५४२ मिळकतधारकांपैकी गुरूवारी १७० हरकती अर्ज मिळकतधारकांची सुनावणी घेण्यात आली़ दोन दिवस चालणाऱ्या या सुनावणीची वेळ ही सकाळी अकरा ते सायंकाळी सहा अशी असून, या सुनावणीसाठी शासनातर्फे व्ही़ एम़ रानडे, रमेश घालवाडकर, सुहास तळेकर यांच्यासह पालिकेतील तीन सदस्यांची समिती तयार करण्यात आली आहे़ या समितीतर्फे गुरूवार व शुक्रवार या दोन दिवसांत कऱ्हाड शहरातील वाढीव हद्दीतील मिळकत धारकांकडून हरकतींबाबत सुनावणी घेतली जात आहे़ या दोन दिवस सुरू असणाऱ्या सुनावणीस पात्र मिळकतधारकांनी उपस्थित राहून आपले विषय मांडावे असे पालिकेच्या वतीने अवाहन करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)
वाढीव हद्दीतील मिळकतदारांची सुनावणी
By admin | Updated: January 2, 2015 00:13 IST